TRENDING:

Viral News - आपल्या बाळाचे निळे-निळे डोळे, पालकांना झाला आनंद; पण त्यामागे असं भयंकर सत्य, आली रडण्याची वेळ

Last Updated:
निळ्या डोळ्यांसह जन्माला आलेल्या बाळाला पाहून सर्वांना आनंद झाला पण हा आनंद काही काळापुरताच मर्यादित राहिला.
advertisement
1/5
बाळाचे निळेनिळे डोळे, पालकांना झाला आनंद; पण त्यामागे असं सत्य, आली रडण्याची वेळ
सामान्यपणे डोळ्यांचा रंग काळा किंवा ब्राऊन असतो. पण काही लोक असे आहेत ज्यांचे डोळे घारे, निळे, हिरवेही असतात. अशा लोकांबद्दल थोडं जास्त आकर्षण वाटतं. असंच एक बाळ जे निळ्या डोळ्यांसह जन्माला आला पण त्यामागील सत्य मात्र भयंकर होतं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
लुइस बाइस नावाच्या महिलेची ही चिमुकली. तिच्या जन्मानंतर तिने तिचे डोळे पाहिले आणि त्यातच हरवली. निळे आणि मोठे डोळे असलेलं हे बाळ. त्यांच्या कुटुंबात असे डोळे कुणाचेच नव्हते. त्यामुळे पालकांना कौतुक वाटत होतंच. पण इतर लोकही उत्सुकतेने त्याला पाहायला येत असत.
advertisement
3/5
बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी सर्व परिस्थिती बदलली. त्याच्या डोळ्यांचा रंग हळूहळू पांढरा होऊ लागला. इतकंच नव्हे तर त्याच्या डोळ्यांवर प्रकाश पडताच ते ओरडू लागला. त्याला वेदना होत होत्या, त्यामुळे तो रडत होता. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
घाबरलेल्या पालकांनी त्याला डॉक्टरांना दाखवलं. तपासणी केली असता त्याला बायलेटरल कॉन्गेनिटर ग्लुकोमा हा आजार असल्याचं समजलं. ही एक जेनेटिक समस्या आहे, ज्यात ऑप्टिकल नर्व्हवर खूप दाब पडतो. लगेच सर्जरी केली नाही तर डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
advertisement
5/5
या बाळाच्या एका डोळ्याची फक्त 5 टक्के दृष्टी बाकी आहे. त्याची सर्जरी करण्यात आली. पण पहिल्या सर्जरीचा परिणाम काही चांगला नव्हता. ऑगस्टमध्ये दुसरी सर्जरी करण्यात आली. अद्याप फॉलोअप टेस्ट बाकी आहे, असं डेली स्टारच्या वृत्तात म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral News - आपल्या बाळाचे निळे-निळे डोळे, पालकांना झाला आनंद; पण त्यामागे असं भयंकर सत्य, आली रडण्याची वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल