TRENDING:

Poisonous Fruits: लीची-काजू सारखी फळं खाताना टाळा 'या' चुका, नाहीतर पोटात गेल्यावर तयार होईल विष

Last Updated:
आरोग्य चांगलं राहावं आणि शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळावीत म्हणून अनेकजण फळं खाणं पसंत करतात. परंतु लिची, काजू सारखी काही फळं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्लीत तर हे पदार्थ पोटात जाऊन विषाप्रमाणे कार्य करू शकतात. ओरेगॉन हेल्थ अँड साइंस यूनिवर्सिटीच्या काही शास्त्रज्ञांनी अशा फळ आणि भाज्यांची नाव सांगितली आहेत ज्यांचे सेवन करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
advertisement
1/8
लीची-काजू सारखी फळं खाताना टाळा या चुका, नाहीतर पोटात गेल्यावर तयार होईल विष
लिची, काजू सारखी फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. परंतु शास्त्रज्ञ पीटर स्पेंसरने सांगितले की जर ही फळं योग्य प्रकारे खाल्ली नाहीत तर त्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. त्यांनी अशा 8 फळांची नावे सांगितली आहेत.
advertisement
2/8
लिची, चवीला खूपच स्वादिष्ट असते, परंतु जर ही लिची तुम्ही कच्ची खाल्लीत तर यात असलेले विषारी पदार्थ तुमचं ग्‍लूकोज लेवल कमी करतात. कच्ची लिची खाल्ल्याने आधीपासूनच आजारी असलेले आणि कुपोषित असलेल्या लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. कच्ची लिची खाल्ल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
advertisement
3/8
कच्चा काजूंमध्ये उरुशीओल नावाचा एक पदार्थ आढळतो. हे तेच संयुग आहे जे आयव्ही नावाच्या वनस्पतीच्या पानांमध्ये आढळते आणि ते खूप विषारी असते. यामुळे त्वचेवर चट्टे उठू शकतात तसेच याच्या सेवनाने पोट खराब होऊ शकते.
advertisement
4/8
चेरी, जर्दाळू, आलूबुखारा, पीच इत्यादी फळांच्या बीमध्ये एक असा पदार्थ आढळतो जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. हा पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर आजारी पडू शकता. यूरोपीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाच्या सांगण्यानुसार, जर हा पदार्थ केवळ 3.5 मिलीग्राम जरी तुमच्या पोटात गेला तर तो विषासमान आहे. त्यामुळे या फळांच्या बिया चुकूनही खाऊ नका.
advertisement
5/8
अक्की हे जमैकाचे राष्ट्रीय फळ आहे. परंतु यात देखील तोच विषासमान पदार्थ आढळतो जो पदार्थ लिचीमध्ये आढळतो. जर तुम्ही अक्की हे फळ पिकण्यापूर्वी कच्चेच खाल्ले तर यामुळे तुम्हाला गंभीर इंफेक्‍शन होऊ शकते.
advertisement
6/8
कसावा आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि एशिया सारख्या अनेक देशांमध्ये आढळते. परंतु जर याला योग्य प्रकारे शिजवले गेले नाही तर हे हाइड्रोजन साइनाइड सोडू शकतो ज्यामुळे थायरॉईड हार्मोनवर वाईट परिणाम होतो. तसेच यामुळे ब्रेन हॅमरेजची समस्या देखील होते.
advertisement
7/8
स्टारफ्रूट हे फळ किडनीची समस्या असलेल्या लोकांनी खाऊ नये. स्टारफ्रूटमध्ये घातक न्यूरोटॉक्सिन असते ज्याच्या सेवनामुळे उचकी, उल्टी, अशक्तपणा, भ्रम इत्यादी समस्या होऊ शकतात.
advertisement
8/8
हिरव्या रंगाचा बटाटा कधीही खाऊ नये. कारण अशा बटाट्यामध्ये विषैला अल्कलॉइड सोलनिन आढळते जे तुम्हाला आजारी पाडू शकते. पोटात दुखणे, मानसिक भ्रम होणे किंवा पक्षाघात अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Poisonous Fruits: लीची-काजू सारखी फळं खाताना टाळा 'या' चुका, नाहीतर पोटात गेल्यावर तयार होईल विष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल