TRENDING:

अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला १२व्या वाढदिवशी भेट दिले Adult Toy; म्हणाली, तुला काय आवडतं ते समजून घे

Last Updated:
Actress Claudia Raia: अभिनेत्री क्लॉडिया रायआ स्वत:च्या मुलीला वाढदिवशी व्हायब्रेटर भेट दिला दिल्याचे एका मुलाखतीत सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली. यावरून आता अभिनेत्रीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/11
अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला १२व्या वाढदिवशी भेट दिले Adult Toy; म्हणाली, तुला..
पालक त्यांच्या मुलांना वाढदिवसाला आवडीनिवडीचा तसेच वयाचा विचार करून गिफ्ट देतात. पण अशाच एका गिफ्टमुळे एक अभिनेत्री मोठ्या वादात सापडली आहे. ब्राझिलियन अभिनेत्री क्लॉडिया रायआ हिने लाईव्ह टेलिव्हिजनवर एका धक्कादायक खुलाशामुळे प्रचंड वाद निर्माण केला आहे.
advertisement
2/11
क्लॉडिया रायआने कबूल केले की १२व्या वाढदिवशी तिने आपल्या मुलीला व्हायब्रेटर भेट दिला होता. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, तिची पोलिस चौकशी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/11
५८ वर्षीय क्लॉडिया रायआ ही ब्राझिलमधील प्रसिद्ध सोप ऑपेरा अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने पोर्तुगीज टेलिव्हिजन शो ‘Goucha’ मध्ये मुलाखत देताना हा धक्कादायक खुलासा केला.
advertisement
4/11
तिने सांगितले की, जेव्हा माझी मुलगी १२ वर्षांची झाली, तेव्हा मी तिला व्हायब्रेटर भेट दिला."तिने पुढे स्पष्ट केले की, मुलीला हे गिफ्ट देत तिने सांगितले, “स्वतःचा शोध घे, तुला काय आवडतं ते समजून घे.”
advertisement
5/11
क्लॉडिया या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इंस्टाग्रामवर एका युजरने लिहिले की, मुलांच्या निरागसतेचा कोणताही आदर करत नाही. अन्य एकाने म्हटले आहे की, अशा प्रकारची घाणेरडी भेट हास्यास्पद आणि अनावश्यक आहे.
advertisement
6/11
यावर प्रचंड गदारोळ सुरू झाल्यानंतर क्लॉडियाने यूटर्न घेतला आणि म्हटले की, चुकीचा अर्थ लावला गेला.
advertisement
7/11
इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्टीकरण देत क्लॉडिया म्हणाली की, मी नेहमीच माझ्या मुलांशी कोणत्याही विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्यात लैंगिक शिक्षण देखील समाविष्ट आहे. माझ्यासाठी माझ्या मुलांना विश्वासार्ह माहिती देणे महत्त्वाचे आहे. मला वाटते की प्रत्येक कुटुंबाची समस्यांना हाताळण्याची स्वतःची पद्धत असते आणि मी त्याचा आदर करते.
advertisement
8/11
ब्राझिलियन वृत्तसंस्था Metropoles च्या अहवालानुसार, मिनास गेराईसच्या काँग्रेसवुमन ख्रिस्तियानो कॅपोरेझो यांनी क्लॉडिया रायआ विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बालक आणि किशोरवयीन कायद्याच्या (Article 241-D) उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे
advertisement
9/11
सेक्स थेरपिस्ट तमारा झानोतेली यांनी क्लॉडियाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. लोक आता व्हायब्रेटर केवळ आनंदासाठी नसून आरोग्यासाठीही वापरतात. काही डॉक्टर देखील त्याचा वापर करण्याची शिफारस करतात, पण १२ वर्षांच्या मुलीला व्हायब्रेटर देणे ही गंभीर बाब आहे. अनेक मुलींना वयात येण्याआधीच लैंगिकतेची समज असते, पण इतक्या कमी वयात सेक्स टॉय देणे चुकीचे आणि त्रासदायक असल्याचे त्या म्हणाल्या.
advertisement
10/11
दरम्यान या सर्व प्रकरणावर सोफिया रायआने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.सोफिया सध्या २२ वर्षांची असून ती स्वतः आई आहे. क्लॉडिया रायआचा मोठा मुलगा एनझो हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
advertisement
11/11
२०२३ मध्ये ५६ वर्षांची असताना आई होण्याच्या निर्णयावरूनही रायआला पूर्वी मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला १२व्या वाढदिवशी भेट दिले Adult Toy; म्हणाली, तुला काय आवडतं ते समजून घे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल