Chanakya Niti : बायकोसोबत 'हे' केल्याने कंगाल होतो नवरा
- Published by:Priya Lad
Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक आयुष्याबाबतही बरेच सल्ले दिले आहेत. पत्नीच्या अशा सवयी ज्याचा चाणक्यनीतीमध्ये उल्लेख आहे.
advertisement
1/5

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीमध्ये प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीसोबत कसं राहायला हवं, हे सांगितलं आहे. चाणक्यनीतीनुसार जो पती आपल्या पत्नीला एक असं सुख जे देऊ शकत नाही, तो कंगाल होतो, असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
2/5
वासना - जर कोणता पुरुष आपल्या बायकोऐवजी दुसऱ्या महिलेचा मोह ठेवत असेल तर अशा पुरुषावर देवी लक्ष्मी नाराज होते. थोड्या कालावधीसाठी धन आणि मान सन्मान मिळेल. पण तो क्षणिक असतो. कारण घरातील लक्ष्मीला खूश ठेवणं एका पुरुषाचं दायित्व असतं.
advertisement
3/5
आळस - जर एखादा पुरुष आळशी असेल, आळस सोडू शकत नसेल तर त्याच्या घरात धनाची कमी असते. लक्ष्मी देवी अशा घरात प्रवेश करत नाही जिथं आळस असतो. असे लोक कर्जात बुडालेले असतात आणि आपल्या स्त्रीला दुःखच देतात.
advertisement
4/5
लालच - लालची पुरुष प्रत्येक गोष्टीची लालच ठेवतात मग ते भौतिक सुख असो वा शाररिक. नेहमी दुसऱ्यांवर त्यांची नजर असते. असे पुरुषही लवकर कंगाल होतात कारण लक्ष्मी त्यांच्यावर नाराज असते.
advertisement
5/5
वाईट वाणी - आपल्या बायकोला तुच्छ लेखणं आणि तिच्यासाठी वाईट शब्दांचा प्रयोग करणारे पुरुष कधीच यशस्वी होत नाहीत. असे पुरुष घरातील वरिष्ठांचाही सन्मान करत नाहीत आणि पापाचे भागीदार होतात. त्यांना कोणती ना कोणती समस्या उद्भवते. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)