MRI मशीनमध्ये स्कॅन करताना कपलचे शारीरिक संबंध; रिपोर्ट VIRAL, उडाली खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Relation In MRI Machine : एमआरआय स्कॅन दरम्यान एका जोडप्याने सेक्स केला आणि जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. या प्रयोगाने वैद्यकीय जगात खळबळ उडवून दिली.
advertisement
1/7

हे चित्रपटातील दृश्य किंवा काल्पनिक कथा नाही, तर वैद्यकीय जगात खळबळ उडवून देणारा एक खरा प्रयोग आहे. खरी माणसे, खऱ्या मशीन्स आणि खरं संशोधन... तेही अशा ठिकाणी जिथं सामान्य माणूस आत शिरल्यावर झोपतो आणि बाहेर पडल्यावर दीर्घ श्वास घेतो. एमआरआय मशीन. जिथं कपलने शारीरिक संबंध ठेवले.
advertisement
2/7
डच शास्त्रज्ञ मॅन्को व्हिक्टर पेक व्हॅन अँडेल यांना मानवी शरीरावर सखोल संशोधन करायचं होतं. शारीरिक संबंध ठेवताना मानवी शरीराच्या आत काय होतं, हे त्यांना पाहायचं होतं. शारीरिक संबंधावेळी शरीरात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं.
advertisement
3/7
कपल एमआरआय मशीनमध्ये जाईल, तिथं शारीरिक संबंध ठेवतील आणि नंतर तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या शरीरातील बदलांचे निरीक्षण केलं जाईल, असं ठरवण्यात आलं. या प्रयोगात अँडेल यांना त्यांची मैत्रीण आयडा सबेलिस आणि तिचा पार्टनर जप यांनी मदत केली.
advertisement
4/7
या प्रयोगातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे एमआरआय मशीनची मर्यादित जागा. त्यावेळी एमआरआय मशीन आजच्या इतकी आधुनिक आणि आरामदायी नव्हती. आतील जागा खूपच अरुंद होती, ज्यामुळे सामान्य स्थिती राखणं अशक्य होते. म्हणून दोघांनी अशी स्थिती निवडली ज्यामुळे दोघंही मशीनमध्ये मावतील.
advertisement
5/7
संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांना नियंत्रण कक्षाकडून सूचना मिळाल्या, कधीकधी स्पष्ट प्रतिमा सुनिश्चित करण्यासाठी त्यांना काही क्षण त्या स्थितीत राहण्यास सांगितलं जात असे.
advertisement
6/7
काही वर्षांनी आयडा सॅबेलिसने एका पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगितला. काही वर्षांनंतर इडा सॅबेलिसने एका पॉडकास्टमध्ये हा अनुभव सांगितला. तिने सांगितलं, सुरुवातीला सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालं नाही. मशीनमध्ये मावणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. जेव्हा हे लक्षात आलं की ठरलेली पोझिशन्स घेता येणार नाही, तेव्हा लगेज पोझिशन्स बदलाव्या लागल्या. तिच्या मते, हा अनुभव थोडा विनोदी असला तरी विज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. महिलांच्या शरीराबाबत अधिक माहिती मिळाली.
advertisement
7/7
1991 चा हा प्रयोग, या प्रयोगाचे निकाल नंतर 1999 मध्ये ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले. त्यावेळी या अभ्यासाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओदेखील प्रकाशित झाले होते. वैद्यकीय जगात याचे फोटो आणि निष्कर्षांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. एका अमेरिकन वापरकर्त्याने अलीकडेच त्याच्या युट्युब चॅनेलवर या अभ्यासाचा व्हिडिओ आणि इतर अनेक अभ्यास संकलित केल्यानंतर हा अभ्यास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
MRI मशीनमध्ये स्कॅन करताना कपलचे शारीरिक संबंध; रिपोर्ट VIRAL, उडाली खळबळ