TRENDING:

सरकारी मदतीसाठी गेली, अन् कळालं... ती तर 'मेलेली'! भावाचं कृत्य समजताच बहिणीला बसला धक्का, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील लुनावाडा तालुक्यातील चापेली मठ गावात राहणाऱ्या शारदाबेन रामघर गोसाई या विधवा महिला त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या वडिलांची...
advertisement
1/5
ती तर 'मेलेली'! भावाचं कृत्य समजताच बहिणीला बसला धक्का, नेमकं प्रकरण काय?
गुजरात राज्यातील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक बहीण जिवंत असतानाही, तिचा भाऊ आणि चुलत भावाने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तिच्या नावावर असलेली 20 एकर जमीन हडपली आहे. ही बाब तेव्हा उघड झाली, जेव्हा पीडित महिला सरकारी मदतीसाठी कार्यालयात गेली आणि तिला सरकारी नोंदींमध्ये ती 'मृत' असल्याचे समजले.
advertisement
2/5
महिसागर जिल्ह्यातील लुनावाडा तालुक्यातील चापेली मठ गावात राहणाऱ्या शारदाबेन रामघर गोसाई या विधवा महिला त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या वडिलांची सर्व संपत्ती त्यांच्या नावावर होती. शारदाबेन जिवंत असतानाही, त्यांचा चुलत भाऊ कैलाश घर आणि त्याचा मुलगा पिंकेश घर यांनी संपत्ती हडपण्याचा कट रचला.
advertisement
3/5
या दोघांनी शारदाबेन यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. एवढेच नाही, तर त्यांनी शारदाबेन यांच्या वडिलांचे नावच त्यांचा पती म्हणून दाखवले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी शारदाबेन यांची 20 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.
advertisement
4/5
शारदाबेन सरकारी कृषी मदत योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना धक्काच बसला. सरकारी नोंदींमध्ये त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले असून, त्यांची जमीन भावाच्या नावावर असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांतीय अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे बनावट कागदपत्रांसह तक्रार केली.
advertisement
5/5
त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाकडून शारदाबेन यांना कधी न्याय मिळणार आणि त्यांना त्यांची जमीन परत मिळेल का, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
सरकारी मदतीसाठी गेली, अन् कळालं... ती तर 'मेलेली'! भावाचं कृत्य समजताच बहिणीला बसला धक्का, नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल