कोब्रा आणि किंग कोब्रामध्ये काय आहे फरक? किंग कोब्रा विषारी सापांना का खातो? थरकाप उडवणारं तथ्य
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
कोब्रा आणि किंग कोब्रा यांची नावं सारखी असली तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. कोब्रा 6 ते 7 फूट लांब असतो तर किंग कोब्रा 20 फूटापर्यंत लांब असतो.
advertisement
1/7

कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. अनेकदा लोक कोब्रा आणि किंग कोब्रा यांना एक मानतात. दोघांची नावं सारखीच आहेत, पण त्यांच्यात मोठा फरक आहे. कोब्रा आणि किंग कोब्रा हे सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय कोब्रा सापाची सरासरी लांबी 6 ते 7 फूट असते. तर किंग कोब्रा सरासरी 6 मीटर (सुमारे 20 फूट) लांब असू शकतो.
advertisement
2/7
भारतीय कोब्रा आणि किंग कोब्रा यांच्यात अन्नाच्या बाबतीतही खूप फरक आहे. भारतीय कोब्राचं मुख्य अन्न म्हणजे उंदीर, बेडूक, सरडे, पक्षी इत्यादी आहे. तर किंग कोब्रा हा असा शिकारी आहे की इतर प्राण्यांशिवाय तो इतर सापांनाही आपली शिकार बनवतो. ज्यात अजगर आणि कोब्रा सापांचाही समावेश आहे.
advertisement
3/7
किंग कोब्राच्या नावामागील कारण त्याचं खाद्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तो लहान-मोठ्या कोब्रा सापांना गिळत असल्याने त्याला 'किंग' असं नाव पडलं. प्रौढ किंग कोब्रा पिवळा, हिरवा, तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो. त्यांच्या शरीरावर सहसा पिवळे किंवा पांढरे पट्टे असतात. दुसरीकडे, कोब्राचा रंग देखील जवळपास असाच आहे. भारतीय कोब्रा काळा, तपकिरी, पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असतो.
advertisement
4/7
किंग कोब्राचे प्राणघातक दात सुमारे 0.5 इंच (8 ते 10 मिलीमीटर) लांब असतात. किंग कोब्रा आणि इंडियन कोब्रा यांचे सरासरी आयुष्यही जवळपास समान आहे. दोघे 18 ते 20 वर्षे जगतात.
advertisement
5/7
किंग कोब्रा ही सापाची एकमेव प्रजाती आहे जी आपल्या राहण्यासाठी जागा बनवते आणि त्यात अंडी घालते. ते स्वत: अंड्यांचे संरक्षण देखील करतात. किंग कोब्राचे डोळे इतके तीक्ष्ण असतात की ते 90 मीटर अंतरावरूनही आपली शिकार पाहू शकतात.
advertisement
6/7
कोब्राच्या प्रामुख्याने चार प्रजाती भारतात आढळतात. यामध्ये स्पेक्टिकल्ड कोब्रा, मोनोप्लेड कोब्रा, सेंट्रल एशियन कोब्रा आणि अंदमान कोब्रा यांचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण किंग कोब्राबद्दल बोललो, तर तो प्रामुख्याने पश्चिम घाट, पूर्व घाट, उत्तराखंड आणि उत्तर पूर्व भागात आढळतो.
advertisement
7/7
कोब्रा आणि किंग कोब्रा दोन्ही अतिशय विषारी असतात. किंग कोब्रा एकाच वेळी इतकं विष फेकतो की सुमारे 20 लोकांचा जीव घेऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कोब्रा आणि किंग कोब्रामध्ये काय आहे फरक? किंग कोब्रा विषारी सापांना का खातो? थरकाप उडवणारं तथ्य