आता माझी सटकली! बायकोला डोसा उशिरा दिल्याने चवताळला नवरा, कल्याणमध्ये राडा
- Published by:Priya Lad
Last Updated:
रस्त्यावर हातगाडीवर मिळणारा डोसा खाण्यासाठी एक कपल गेलं. पण इथं विक्रेत्याने बायकोला डोसा उशिरा दिल्याने नवऱ्याला राग आला. कपलनं रस्त्यात राडा केला आहे.
advertisement
1/5

बऱ्याच लोकांना स्ट्रीट फूड खायला आवडतं. रस्त्यावर खाद्यपदार्थांचे असे कितीतरी स्टॉल लागतात. असाच रस्त्यावर हातगाडीवर मिळणारा डोसा खाण्यासाठी गेलं ते एक कपल. पण इथं विक्रेत्याने डोसा उशिरा दिल्याने कपलनं राडा केला आहे.
advertisement
2/5
कल्याण स्टेशनजवळील गांधी चौक परिसरातील हा अजब प्रकार आहे. एक महिला डोसा खाण्यासाठी हातगाडीवर गेली. मात्र तिला डोसा द्यायला विक्रेत्याने उशीर केला. डोसा उशिराने मिळाल्याने महिलेनं विक्रेत्याशी वाद घातला.
advertisement
3/5
तिनं याबाबत आपल्या नवऱ्याला सांगितलं. तिचा नवरा हातगाडीजवळ आला आणि त्याने गोंधळ घातला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
4/5
निकून ठक्कर असं हातगाडीवर राडा करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. व्हिडीओमध्ये तो आक्रमक झालेला दिसतो. हातगाडीजवळ तोडफोड करताना दिसतो.
advertisement
5/5
काही लोक त्याला अडवून तिथून दूर नेण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहेत. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
आता माझी सटकली! बायकोला डोसा उशिरा दिल्याने चवताळला नवरा, कल्याणमध्ये राडा