सॅलरी किती आहे? कुणी तुम्हाला तुमचा पगार विचारला तर काय सांगायचं? तज्ज्ञांनी सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
कुणी पगार विचारल्यावर त्यावर आपलं उत्तर काय असायला हवं, याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
advertisement
1/7

तुम्हाला पगार किती, असा प्रश्न अनेक जण विचारतात. ज्यांना जास्त पगार आहे ते बिनधास्त सांगतात, तर ज्यांना कमी पगार आहे ते सांगायला संकोचतात. काही जणांना आपला पगार कुणाला सांगायला आवडतच नाही.
advertisement
2/7
मग कुणी तुम्हाला तुमचा पगार विचारला तर नेमकं काय सांगायचं, याचं उत्तर काय द्यायचं, जो पगार आहे तो सांगायचा आहे की कमी किंवा जास्त करून सांगायचा, असे एक ना दोन कितीतरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.
advertisement
3/7
जर तुमचा पगार इतका भरमसाठ असेल की समोरच्याने आकडा ऐकला तरी तो थक्क होत असेल तर तुम्ही तुमचा बिनधास्त सांगा
advertisement
4/7
जर तुमचा पगार कमी असेल तर उटलसुलट फिरवून उत्तर द्या. म्हणजे एकच पगार न सांगता, पॅकेज किंवा बोनससारख्या गोष्टी असं वेगवेगळं एकत्र करून सांगा.
advertisement
5/7
जर तुम्हाला तुमची कॉलर टाइट ठेवायची असेल तर पगार वाढवून सांगा. तसं कुणी तुम्हाला खरंच तितका पगार आहे का हे तपासयाला येणार नाही.
advertisement
6/7
जर तुम्हाला कुणी तुमचा पगार विचारत असेल याचा अर्थ त्याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे, त्यामुळे पगार जास्त वाढवून सांगायला काहीच हरकत नाही.
advertisement
7/7
यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्युट दृष्टीचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी एका व्हिडीओत ही माहिती दिल्याचं वृत्त डीएनएनं दिलं आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक : Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
सॅलरी किती आहे? कुणी तुम्हाला तुमचा पगार विचारला तर काय सांगायचं? तज्ज्ञांनी सांगितलं