Fish And Milk : मासे खाल्ल्यावर दूध का पिऊ नये; प्यायलो तर शरीरावर काय होतो परिणाम?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Eating Fish And Milk : मासे आणि दूध हे स्वतंत्रपणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी एकत्र किंवा लगेच एकामागोमाग घेतल्यास ते विरुद्ध आहार ठरू शकतात.
advertisement
1/5

मासे आणि दूध हे दोन्ही पोषणमूल्यांनी भरपूर असलेले पदार्थ मानले जातात. मासे हे प्रथिनं, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि खनिजांनी समृद्ध असतात, तर दूध हे कॅल्शियम, प्रथिनं आणि जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. मात्र आयुर्वेद आणि पारंपरिक आहारशास्त्रानुसार मासे खाल्ल्यानंतर दूध पिणं टाळावं, असं सांगितलं जातं. यामागे नेमकी कारणं काय आहेत?
advertisement
2/5
आयुर्वेदात काही अन्नपदार्थांना विरुद्ध आहार मानले जातं. मासे आणि दूध हा त्यापैकी एक. मासे उष्ण आणि दूध थंड प्रभावाचं आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास किंवा मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास शरीरातील अग्नी म्हणजे पचनशक्ती बिघडते. त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होतात
advertisement
3/5
मासे आणि दूध हे दोन्ही पचायला जड असलेले पदार्थ. दोन्ही एकत्र किंवा लागोपाठ घेतल्यास पोट फुगणं, गॅस, अपचन, मळमळ, उलटी, जुलाब किंवा बद्धकोष्ठता असे त्रास काही होऊ शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा पोटाचे विकार असलेल्यांनी असा आहार टाळावा.
advertisement
4/5
मासे आणि दूध एकत्र घेतल्याने त्वचेवर पांढरे डाग, खाज, पुरळ, अ‍ॅलर्जिक रिऍक्शन होण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वांनाच हे त्रास होतात असं नाही. पण संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांमध्ये हा धोका जास्त असू शकतो.
advertisement
5/5
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने लगेच गंभीर धोका होतो, असे ठोस पुरावे नाहीत. मात दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पचन एन्झाइम्सने पचतात. काही लोकांमध्ये हे कॉम्बिनेश डायजेस्टिव इन्टोलरन्स निर्माण करू शकतं. त्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. (सर्व फोटो : प्रतीकात्मक/AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Fish And Milk : मासे खाल्ल्यावर दूध का पिऊ नये; प्यायलो तर शरीरावर काय होतो परिणाम?