नागापेक्षाही खतरनाक, चौपट विषारी! 'या' सापाला म्हणतात Silent killer
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
भारतात 13 प्रजातींचे विषारी साप आढळतात. त्यापैकी कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर आणि करैत हे चार साप अत्यंत धोकादायक असतात.
advertisement
1/5

पावसाळ्यात साप, विंचू अशा विषारी प्राण्यांचा जणू सुळसुळाट असतो. अंधाऱ्या, ओलसर जागी ते सहज आढळतात. थंडीत मात्र साप दिसेनासे होतात, कारण पुढच्या ऋतूत बिनधास्त वावरण्यासाठी या काळात ते शरिरात ऊर्जा साठवत असतात. त्यामुळे आता उन्हाळा सुरू झाला असल्याने साप बिळांबाहेर पडायलाही सुरूवात झाली असेल.
advertisement
2/5
लहान असो किंवा मोठा असो, साप दिसला की भलेभले थरथरतात. परंतु सगळेच साप विषारी नसतात. काही साप बिनविषारी असतात, तर काही साप प्रचंड खतरनाक असतात. अशाच भारतातल्या सर्वात खतरनाक सापाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
3/5
'इंडियन करैत' (Indian krait) अशी या सापाची प्रजाती. तो चावल्यास वेळेत उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कारण तो नागापेक्षाही खतरनाक असतो. तो मध्यरात्री येतो आणि झोपेतच डसतो. म्हणूनच त्याला 'सायलंट किलर' (Silent killer)सुद्धा म्हणतात.
advertisement
4/5
हा साप प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, परंतु त्याचं विष मात्र शरिरभर झपाट्याने पसरतं आणि झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होतो. तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळ्या शरिरावर पांढरे पिवळसर पट्टे असतात.
advertisement
5/5
करैत साप प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात आढळतो. देशात घडणाऱ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये सर्वाधिक याच सापाचा समावेश असतो. तो चावल्यावर 45 मिनिटांमध्ये व्यक्तीचा मुत्यू होतो. 6.5 फूट लांब असलेला हा साप साधारण 10 ते 17 वर्षे जगतो.