TRENDING:

देव नाही, मूर्ती नाही, पूजाही होत नाही; तरी या मंदिरात लोकांची गर्दी, तासनतास लावतात रांगा

Last Updated:
MysteriousTemple In India : या मंदिरात पारंपारिक देवता नाहीत, तरीही ते सतत भाविकांची गर्दी आकर्षित करतं. भारतात असं मंदिर कुठे आहे, माहिती आहे का?
advertisement
1/5
देव नाही, मूर्ती नाही, पूजाही होत नाही; तरी या मंदिरात गर्दी, तासनतास रांगा
भारतात कितीतरी मंदिर आहेत. जिथं भाविकांची गर्दी होते. मंदिर म्हणजे तिथं देवाची मूर्ती असते. पूजाअर्चा होते. पण भारतातील असं एक मंदिर जिथं देव नाही, कोणतीच मूर्ती नाही, पूजाअर्चा होत नाही तरी दररोज हजारो भाविक इथं येतात. तासनतास रांगा लावतात.
advertisement
2/5
हे अनोखं मंदिर हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये आहे. हा एक सेट आहे जिथं फिल्मचं शूटिंग केलं दातं. तुम्ही चित्रपटांमध्ये मंदिरातील दृश्ये पाहिली असतील. बहुतेक प्रकरणांमध्ये हे दृश्य प्रत्यक्ष मंदिरांपेक्षा सेटवर चित्रित केले जातात. चित्रपटाच्या गरजेनुसार सेटवर संबंधित देवतेची मूर्ती स्थापित केली जाते, ज्यामुळे त्या ठिकाणाचं रूपांतर त्या देवतेला समर्पित मंदिरात केलं जातं.
advertisement
3/5
रामोजी फिल्म सिटीमधील एका टुरिस्ट गाईडच्या मते, चेन्नई एक्सप्रेस फिल्ममधील एक सीन जिथं शाहरुख खान दीपिका पदुकोणला घेऊन जातो ते या मंदिराच्या सेटवर चित्रित करण्यात आलं होतं. चित्रपटात दाखवलेल्या पायऱ्या इथून आहेत.
advertisement
4/5
चित्रपटात त्या खूप उंच दाखवल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या इतक्या उंच नाहीत. या फिल्ममुळे अजूनही मोठ्या संख्येने लोक या सेटला भेट देतात.
advertisement
5/5
रामोजी फिल्म सिटी ही जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी आहे, जी हैदराबादमध्ये आहे. बस किंवा ऑटोने इथं सहज पोहोचता येतं. प्रवेश तिकिटांची किंमत 1950 रुपये आहे, वेळोवेळी विविध ऑफर उपलब्ध आहेत. मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तिकिटं कमी किमतीत उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
देव नाही, मूर्ती नाही, पूजाही होत नाही; तरी या मंदिरात लोकांची गर्दी, तासनतास लावतात रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल