बॉलिवूडची गायिका, जिच्या गाण्यामुळे वाचले तब्बल 3000 जीव, कसे काय आणि ही आहे कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Singer Save Childrens Life : बॉलिवूडची ही गायिका जिचा गोड आवाज फक्त हृदय जिंकत नाही आहे तर त्यामुळे धडधड की वाजते आहे. तिच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक रेकॉर्डमध्येही झाली आहे.
advertisement
1/5

आपण सगळे जण गाणी ऐकतो ती मनोरंजनासाठी पण गाण्यामुळे कुणाचा जीव वाचू शकतो, असं तुम्हाला सांगितलं तर... तुम्हाला विश्वास बसणार नाही एक गायिका जिच्या आवाजाची जादू अशी की तिच्या गाण्यामुळे तब्बल 3000 पेक्षा जास्त जीव वाचले आहेत.
advertisement
2/5
ही गायिका कॉन्सर्ट करते आणि त्यातून मिळणारे पैसे ती गरीब लहान मुलांच्या हार्ट सर्जरीसाठी देते, ज्यांच्या आईवडिलांना हा खर्च परवडणारा नाही. गाण्याच्या शोमधून जमा झालेल्या पैशांतून आतापर्यंत 3800 मुलांच्या हार्ट सर्जरी झाल्या आहेत.
advertisement
3/5
गायिका सांगते, जेव्हा माझ्याकडे फिल्मचं प्रोजेक्ट नसतो. तेव्हा मी कॉन्सर्टमध्ये 3 तास गाते, फक्त मुलांसाठी निधी जमा करण्यासाठी. एकाच कॉन्सर्टमध्ये मी 13-14 सर्जरीचा निधी जमा करते. स्टेज शोची कमाई ते नसेल तर सेव्हिंग्सही ती यासाठी वापरते. 2013 साली फक्त एका वर्षात अडीच कोटी रुपये जनवून 572 मुलांची सर्जरी केली.
advertisement
4/5
लहानपणी ट्रेनमध्ये गरीब मुलांना पाहिल्यानंतर तिने त्यांना मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. 7 वर्षांची तिने हा उपक्रम सुरू केला आता ती हे आपल्या आयुष्यातील मोठं ध्येय असल्याचं सांगते. ती म्हणाली, अजून 413 मुलं माझ्या प्रतीक्षा यादीत आहेत. ही माझी जबाबदारी आहे, जी मी आयुष्यभर पार पाडेन.
advertisement
5/5
आता ही गायिका कोण तर पलक मुच्छल. इंदौरची ही गायिका जिचं पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशन आहे. मेरी आशिकी, कौन तुझे, प्रेम रतन धन पायो अशा सुपरहिट गाण्यांतून कमाईचा हिस्सा या फाऊंडेशनला जातो. तिने 1999 मध्ये कारगिल शहीद कुटुंबासाठी निधी जमा केला, 2001 मध्ये गुजरात भूकंप पीडितांसाठी 10 लाख रुपये दिले होते. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बॉलिवूडची गायिका, जिच्या गाण्यामुळे वाचले तब्बल 3000 जीव, कसे काय आणि ही आहे कोण?