Prediction : गायब होणार सूर्य, त्यानंतर घडणार ते भयानक! 2026 वर्ष सुरू होण्याआधी आली मोठी भविष्यवाणी, सगळे घाबरले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shocking Future Prediction : सगळे जण 2025 वर्षे संपून 2026 वर्ष कधी सुरू होत आहेत, याची वाट पाहत आहेत. याचदरम्यान एक भयानक भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

2025 वर्ष संपतच आलं आहे, 2026 या नव्या वर्षाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत आहेत. सोबतच नव्या वर्षात काय लिहून ठेवलं आहे, याचीही चिंता आहे. याचदरम्यान स्वतःला टाइम ट्रॅव्हरल म्हणवणाऱ्या एका व्यक्तीची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या व्यक्ती सूर्य गायब होणार, त्यानंतर भयंकर घडणार असं सांगितलं आहे.
advertisement
2/7
एनो अलारिक नावाची ही व्यक्ती @radianttimetraveller नावाचं तिच टिकटॉक अकाउंट आहे. ही व्यक्ती स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवते. टाइम ट्रॅव्हल म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात प्रवास करणं. आजपर्यंत आपण जे फक्त ऐकलं आणि फिल्ममध्ये पाहिलं.
advertisement
3/7
प्रत्यक्षात आहे की नाही ते माहिती नाही. पण अनेक लोक याबाबत दावे करतात. अशाच लोकांपैकी ही व्यक्ती जिने आपण 2671 सालातून परतल्याचा दावा केला आहे. तसंच या वर्षात घडणाऱ्या घटनांबाबत इशाराही दिला आहे.
advertisement
4/7
द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, त्याने सांगितलं की सूर्य एका आठवड्यासाठी नाहीसा होईल. 9 नोव्हेंबर 2671 रोजी ही घटना घडणार आहे त्यानंतर एक विचित्र अस्तित्व दिसून येईल, जो एक असा आजार पसरवेल ज्यावर कुणाकडेही उपचार नसतील.
advertisement
5/7
12 नोव्हेंबर रोजी अंटार्क्टिकामध्ये बर्फाखाली एक एलियन गाडलेला आढळेल, ज्यामुळे एक रहस्यमय आजार होईल जो जगभरात वेगाने पसरेल आणि कोणताही उपचार नसेल.
advertisement
6/7
ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही लोक घाबरले आहेत, तर काहींनी खिल्ली उडवली आहे. एका युझरने म्हटलं, "देवाचे आभार, आम्ही त्यावेळी तिथे नसू" तर दुसऱ्याने म्हटलं, "एक आठवडा अंधार असेल आणि वीज कंपन्यांना फायदा होईल" (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
advertisement
7/7
हा लेख सोशल मीडियावर व्हायरल माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. यात करण्यात आलेल्या दाव्याचं समर्थन न्यूज18मराठी करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Prediction : गायब होणार सूर्य, त्यानंतर घडणार ते भयानक! 2026 वर्ष सुरू होण्याआधी आली मोठी भविष्यवाणी, सगळे घाबरले