धोकादायक सापांची झटक्यात करतात शिकार, 'या' खतरनाक पक्ष्यांविषयी माहितीय का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
साप हा खूप धोकादायक आहे. मात्र असेही काही पक्षी आहेत जे या सापांची एका झटक्यात शिकार करतात.
advertisement
1/7

लाल शेपटी असलेला हाक, ज्याला चिकनहॉक देखील म्हणतात, हा सर्वात धोकादायक आहे. उत्तर अमेरिकेत आढळणारे हे गरुड फक्त साप खाऊन जगतात. त्यांचे पंख हलके किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांची शेपटी लालसर असते. त्यांची सरासरी लांबी 18 ते 26 इंच असते.
advertisement
2/7
ग्रेट ब्लू हेरॉन हा उत्तर अमेरिका, कॅरिबियन आणि गॅलापागोस बेटांवर आढळणारा एक मोठा पक्षी आहे. मोठ्या आकाराच्या आणि निळ्या-तपकिरी पंखांमुळे त्याला हे नाव मिळालं. ग्रेट ब्लू बगळे प्रामुख्याने मासे खातात, परंतु अनेकदा सापांची शिकार करतात.
advertisement
3/7
आफ्रिकेत आढळणारे सेक्रेटरी पक्षी त्यांच्या लांब पाय आणि स्नायूंच्या शरीरामुळे हॉक आणि करकोचे यांचे मिश्रण असल्याचं दिसून येते. पण ते अनेकदा पायी शिकार करण्यासाठी ओळखले जातात. साप खाण्यासाठी खास पद्धत अवलंबतात. एकदा त्यांना साप दिसला की ते त्यांच्या शरीराच्या वजनाच्या अंदाजे 5 पट शक्तीने त्याच्यावर हल्ला करतात. त्यामुळे सापाला पळून जाण्याची संधी मिळत नाही.
advertisement
4/7
अमेरिकेत आढळणारे फाल्कन हे पक्षी एका क्षणात सापाला मारू शकतात. सापाची शिकार करण्यासाठी ते प्रथम हवेतून येतात आणि त्यावर झेपावतात. त्यानंतर त्यांनी आपल्या धारदार चोचीने सापाचे डोके चावतात.
advertisement
5/7
ग्रेट हॉर्नड घुबडला वाघ घुबड असंही म्हणतात. अमेरिकेत आढळणाऱ्या या पक्ष्यांना त्यांच्या डोक्यावरील विशिष्ट टफ्ट्समुळे हे नाव मिळालं. जे शिंगांसारखे दिसतात. साप खाणाऱ्या पक्ष्यांपैकी हा एक पक्षी आहे. ते लपून बसून हल्ला करतात.
advertisement
6/7
ब्राउन स्नेक ईगल हा आफ्रिकेच्या काही भागांत आढळणारा मोठा शिकारी पक्षी आहे. गडद तपकिरी पिसांमुळे हे नाव पडले. ते ॲडर, कोब्रा आणि ब्लॅक माम्बासह मोठे, लहान किंवा विषारी साप देखील खातात. त्यांनी साप पकडला की ते संपूर्ण गिळतात. साप खूप मोठा असेल तर ते फाडून खातात.
advertisement
7/7
कोंबडी हे घरगुती पक्षी आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की ते सापही खातात. सहसा ते लहान सापांवर हल्ला करतात. त्यांना मारण्यासाठी ते त्यांच्या धारदार चोचीचा वापर करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
धोकादायक सापांची झटक्यात करतात शिकार, 'या' खतरनाक पक्ष्यांविषयी माहितीय का?