TRENDING:

Wedding Tradition : पान-सुपारी खाणं वाईट म्हणतात मग लग्नात नवरा-नवरीच्या तोंडात विडा का देतात?

Last Updated:
Wedding Rituals : ऐन लग्नात नवरा-नवरीला पान खायला किंवा तोंडात ठेवायला दिलं जातं. कित्येक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पण याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7
पान-सुपारी खाणं वाईट म्हणतात मग लग्नात नवरा-नवरीच्या तोंडात विडा का देतात?
लग्नाच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा लग्न लागतं. तेव्हा अंतरपाटाच्या एका बाजूला नवरा आणि बाजूला नवरी असतात. त्या दोघांच्या तोंडात पानाचा विडा दिला जातो.
advertisement
2/7
एरवी अशी दररोज पान-सुपारी खाणं चांगलं नाही असं म्हणतात. पण मग ऐन लग्नात नवरा-नवरीच्या तोंडात पान का दिलं जातं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
advertisement
3/7
नवरा-नवरीच्या तोंडात पान ठेवण्याची ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. एक विधी म्हणून सगळे तो करतात. पण त्यामागील कारण अनेकांना माहिती नसेल.
advertisement
4/7
हिंदू संस्कृतीत धार्मिक कार्यात विड्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्यात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आणि शुभ संकेत मिळवण्यासाठी पानाचा वापर केला जातो. त्यामुळे विड्याचं पान हे पारंपारिक संस्कृती आणि विधीचा भाग बनलं आहे.
advertisement
5/7
वधू-वराचा लग्नाच्या दिवशी उपवास असतो. त्यांना काही खाण्याची परवानगी नसते. यामुळे तोंड कोरडं पडण्याची शक्यता असते. पान तोंडात असल्याने तोंडात लाळ तयार होते आणि तोंड कोरडं पडत नाही.
advertisement
6/7
तसंच पान खाल्ल्याने मन शांत राहतं. त्यामुळे लग्नाच्या वेळी चिंतेमुळे होणाऱ्या मानसिक तणावाला शांत करण्यात पान मदत करतं.
advertisement
7/7
लग्नात नवरा-नवरी तोंडात विड्याचं पान का धरतात? यामागील कारण याआधी तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Wedding Tradition : पान-सुपारी खाणं वाईट म्हणतात मग लग्नात नवरा-नवरीच्या तोंडात विडा का देतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल