TRENDING:

Weird Animal : अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेला हा जीव; याचा कधीच होत नाही मृत्यू

Last Updated:
या जीवात असा खास गुण आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू होत नाही.
advertisement
1/5
अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेला हा जीव; याचा कधीच होत नाही मृत्यू
असं म्हणतात की जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो. पण पृथ्वीवर असा एक जीव आहे जो अमर आहे. म्हणजे कधीच मरत नाही. हायड्रा असं त्याचं नाव.
advertisement
2/5
हायड्रा गोड्या पाण्यात आढळतात, वाहत्या किंवा साचलेल्या पाण्यातही असू शकतात. ते तलावांमध्ये, वेगाने वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये आढळू शकतात, जिथं दगड, जलीय वनस्पती आणि वनस्पती आहेत. प्रदूषित पाण्यात नाही तर स्वच्छ पाण्यात आढळतात.
advertisement
3/5
डॅनियल मार्टिनेझ यांनी अमेरिकेतील पोमोना कॉलेजमध्ये हायड्रावर संशोधन केले. जे 'प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोणत्याही परिणामाशिवाय ते कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकते.
advertisement
4/5
हायड्राचे मूळ शरीर स्टेम पेशींनी बनलेलं असतं. त्यात खूप कमी पेशी असतात. त्याच्या मूलभूत पेशी सतत नवीन पेशी बनवण्यास सक्षम असतात, ज्यामुळे हायड्राच्या शरीरात नवीन पेशी सतत तयार होत असतात आणि त्या नेहमी तशाच राहतात. तो जीव पेशीपासून तयार होतो आणि नंतर बहुपेशीय म्हणून ओळखला जातो.
advertisement
5/5
संशोधनानुसार, हायड्रा एक सेंटीमीटर लांब आहे. त्याचं वय अद्याप माहित नाही. हायड्राचं जीवन 'मृत्यू ही प्रत्येक सजीवाची अपरिहार्य प्रक्रिया आहे' या तत्त्वाच्या विरुद्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Animal : अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेला हा जीव; याचा कधीच होत नाही मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल