TRENDING:

Mobile Interesting Facts : मोबाईल 1% टक्के बॅटरीनंतर बंद का होतो? 0 टक्के का दाखवत नाही?

Last Updated:
Mobile Charging : तुम्ही पाहिलं असेल की मोबाईलचं चार्जिंग 1 टक्के दिसतो आणि त्यानंतर फोन डायरेक्ट स्वीच ऑफच होतो. मोबाईलची बॅटरी 0% दिसत नाही, असं का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5
मोबाईल 1% टक्के बॅटरीनंतर बंद का होतो? 0 टक्के का दाखवत नाही?
स्क्रीनवर दिसणारा 1%, 2%, 50%, 0% हा खरा चार्ज नसून अंदाज असतो. तो बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम ठरवतो. बीएमएस आधीच फोन बंद करून बॅटरीला नुकसान होऊ देत नाही.
advertisement
2/5
फोनची बॅटरी प्रत्यक्षात कधीच 0% होत नाही, कारण असं झालं तर बॅटरी कायमची खराब होऊ शकते. त्यामुळे मोबाईल कंपन्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरद्वारे बॅटरीला सुरक्षित मर्यादा देतात.
advertisement
3/5
फोनमध्ये Li-ion / Li-polymer बॅटरी असते. ही बॅटरी जर खरोखर 0% पर्यंत गेली तर तिचे रासायनिक सेल्स खराब होतात आणि बॅटरी चार्ज घेणं थांबवते.
advertisement
4/5
फोन पूर्णपणे ऑफ झाला तरी काही मायक्रोचिप्स आणि सुरक्षा सर्किट्सना थोडा चार्ज लागतो. जर बॅटरी खरोखर 0 टक्के झाली तर सर्किट्सही बंद पडतील आणि फोन सुरू होणार नाही.
advertisement
5/5
पूर्ण 0% आणि 100% या दोन्ही मर्यादा बॅटरीसाठी खराब असतात. 20%–80% हा सर्वात हेल्दी चार्ज रेंज आहे. म्हणूनच कंपन्या फोनला पूर्ण 0% होऊ देत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : मोबाईल 1% टक्के बॅटरीनंतर बंद का होतो? 0 टक्के का दाखवत नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल