TRENDING:

अमरावतीत सुलभा खोडके आमदार, विजयानंतर महिला म्हणतात, काही अडचणी असतील त्याचे…

Last Updated:

2024 च्या अमरावती विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके या 60087 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर अमरावतीमधील महिला मतदार समाधानी आहेत की नाही? जाणून घेऊया. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : अमरावतीमध्ये आठ मतदार संघ आहेत. त्यापैकी अमरावती विधानसभा मतदार संघात 23 उमेदवार रिंगणात होते. महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार सुलभा खोडके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांच्यात मुख्य लढत होती. 20 नोव्हेंबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची आज 23 नोव्हेंबरला लोकशाही भवन अमरावती येथे मत मोजणी झाली. 2024 च्या अमरावती विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके या 60087 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर अमरावतीमधील महिला मतदार समाधानी आहेत की नाही? जाणून घेऊया.

advertisement

अमरावती विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुलभा खोडके विजयी झाल्यात. त्यामुळे महिला मतदार समाधानी आहेत की नाही? याबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने महिलांशी चर्चा केली. तेव्हा त्या सांगतात की, आम्हाला सुलभा खोडकेच पाहिजे होत्या. कारण त्यांनी आमच्या भागात ( महेंद्र कॉलनी, कठोरा नाका) खूप विकास कामे केलेली आहेत. पुढेही त्या करतील अशी अपेक्षा आहे. महिला निवडून आल्याने आम्हाला अधिक आनंद झाल्याचे सुद्धा महिलांनी सांगितले.

advertisement

जरांगेंच्या जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीच्या पारड्यात कशा?

View More

पुढे महिला सांगतात की, सुलभा खोडके यांनी आमच्या एरियामध्ये वेळोवेळी भेटी दिल्या. काही अडचणी असतील त्याचे निवारण केले. त्यामुळे आम्हाला आमदार म्हणून सुलभा खोडके याच अपेक्षित होत्या. महिलांनी फटाक्यांच्या आवाजात आपला आनंद व्यक्त केला. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्ती पर्यंत आनंद व्यक्त करत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

काही महिला सांगतात की, महिलांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सुलभा खोडके बेस्ट आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचं पाहिजे होत्या. आमच्या एरियात महिलांना, लहान मुलांना अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सुलभा खोडकेचं अपेक्षित होत्या.

मराठी बातम्या/Politics/
अमरावतीत सुलभा खोडके आमदार, विजयानंतर महिला म्हणतात, काही अडचणी असतील त्याचे…
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल