सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं आज मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीचं अक्षरश: पानिपत झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही पराभूत झाले आहेत.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहता तीन मतदारसंघात देखील महायुतीचा विजय झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे निलेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या वैभव नाईक यांचा 8 हजार 176 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे तर राणे यांचे दुसरे सुपुत्र नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या संदेश पारकर यांचा 56 हजार मतांनी पराभव केला आहे. सावंतवाडी मतदार संघाचा विचार करता त्या ठिकाणी शिंदे सेनेचे दीपक केसरकर हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात खा. नारायण राणे यांनी आपला गड राखण्यात यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यात लाडक्या बहिणींच्या वतीने महायुतीचा विजय जल्लोषात साजरा, VIDEO
या निकालाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या. काही लोकांना हा निकाल अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल असल्याचे ऐकायला मिळाले. या निकाला बाबत महायुतीचे कार्यकर्ते सांगतात की हा विजय हिंदूत्वचा विजय आहे. महायुती कडून झालेल्या विकास कामाचा हा विजय आहे. एकंदरीत पाहिलं तर तर विरोधकांना मात्र ही हार अनपेक्षित असल्याच बोललल जात आहे.





