कोल्हापूर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होत आहेत. कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना मात देत अमल महादेवराव महाडिक यांनी निर्णायक आघाडी घेतलीये. 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा महाडिक यांनी बदला घेतला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय.
advertisement
महायुती कोल्हापूर-दक्षिण विधानसभेसाठी अमल महादेवराव महाडिक यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील ऋतुराज संजय पाटील यांना उमेदवारी दिली होती. आज 23 नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी निकाल महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या बाजूने होत असताना दिसत आहे. 18 वी फेरीनंतर महाडिक यांना 21000 हून अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या कार्यालयात समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील होत आहे. तसेच जल्लोष केला जात आहे. यात महिलावर्गाचा ही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
जालन्यात महायुती फॅक्टर! अर्जुन भाऊ 100 टक्के निवडून येणार, कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा महाडिक आणि पाटील यांच्यात थेट लढत होते. यामुळे अखंड कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलेलं असतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच कोण जिंकणार यावर चर्चा सुरू होती. कोल्हापुरातील या मतदारसंघात कोणता नेता जिंकणार यावर पैजाही लागल्या होत्या. परंतु, यंदा महाडिक गटानं बाजी मारल्याने सतेज पाटील गटाला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे.





