सोशल मीडिया क्रेझ आणि धोकादायक स्टंट
मध्य रेल्वेच्या एका एक्स्प्रेस गाडीच्या एसी डब्यात ही महिला इलेक्ट्रॉनिक किटलीमध्ये मॅगी बनवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. प्रवासी सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, महिला निर्धास्तपणे स्वयंपाक करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. एवढेच नाही तर ती विनोद करत माझं स्वयंपाकघर कुठेही सुरू आहे असे म्हणताना आणि आता 15 लोकांसाठी चहा सुद्धा बनवायचा आहे असे सांगताना दिसते.
advertisement
आता वेळ वाचणार, मुंबईला धाव घेण्याची गरज संपली, सीईटीच्या तक्रारी जिल्ह्यातच सुटणार
व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा रोष
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. रेल्वे प्रवासामध्ये अशा धोकादायक वर्तनामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या. अनेकांनी रेल्वे सुविधांचा गैरवापर, इतर प्रवाशांच्या जीवाला घातक ठरू शकणारे हे कृत्य आणि वाढता बेदरकारपणा यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रेल्वेचे नियम आणि गुन्ह्याचे गांभीर्य
या प्रकरणाची तात्काळ दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित महिला प्रवाशावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, फक्त तिलाच नव्हे तर हा व्हिडिओ शूट करून व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वेने सांगितले की, प्रवासादरम्यान इलेक्ट्रॉनिक किटलीसारख्या ज्वलनशील किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तूंचा वापर कडक बंदी असलेला नियम आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारचा स्वयंपाक करणे असुरक्षित, बेकायदेशीर आणि रेल्वे कायद्याअंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. यामुळे आग लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांना अशा धोकादायक कृतींपासून दूर राहण्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
रेल्वेने पुन्हा एकदा सांगितले की, प्रवासादरम्यान सुरक्षेचे नियम शिथिल केले जाणार नाहीत. सोशल मीडियासाठी स्टंट किंवा व्हिडिओ बनवताना कोणत्याही परिस्थितीत इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारी कृती सहन केली जाणार नाही.






