Heart Attack : हार्ट अटॅक येतोय असं वाटलं तर काय करायचं? पुण्याच्या हार्ट एक्सपर्ट्सनी सांगितला उपाय
- Published by:Priya Lad
Last Updated:
What To Do After Heart Attack : हार्ट अटॅक आला की रुग्ण आणि त्याच्या आजूबाजूला असणारे लोक सगळे घाबरतात. अशा वेळी काय करावं ते सूचत नाही. हार्ट अटॅक आला तर काय करायचं याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
आधी वृद्धांचा आजार समजला जाणारा हार्ट अटॅक आता कमी वयातच येऊ लागला आहे. अचानक हृदयविकाराची प्रकरणं वाढत आहेत. हार्ट अटॅक आला की रुग्ण आणि त्याच्या आजूबाजूला असणारे लोक सगळे घाबरतात. अशा वेळी काय करावं ते सूचत नाही. हार्ट अटॅक आला तर काय करायचं याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
हार्ट अटॅक येतोय असं वाटलं तर काय करायचं याबाबत पुण्यातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, छातीत दुखतंय, घाम येतोय अशी हार्ट अटॅकची लक्षणं दिसली की सगळ्यात आधी ट्रान्सपोर्टची व्यवस्था करावी म्हणजे कुठे जायचं ते ठरवावं. कुणाला तरी फोन करा आणि अॅम्बुलन्स बोलवायला सांगा. कुणाला फोन करायचं ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये हवं. म्हणजे अशा परिस्थिती काही सूचत नाही, लोक पॅनिक होतात. एखाद्या डॉक्टरचा नंबर आपल्याकडे हवा ज्याच्याशी तुम्ही बोलून लगेच निर्णय घेऊ शकता.
advertisement
दुसरं म्हणजे त्या व्यक्ती 45 डिग्रीत बसवायचं, 3-4 उशा लावून बसवा किंवा इझी चेअरमध्ये बसवा. आडवं झोपवू नका किंवा खुर्ची पूर्ण उभं बसवू नका. कपडे थोडे सैल करा. त्याला डिस्प्रिनची गोळी द्या. अशा व्यक्तीला गाडीतून नेताना त्याचे डोळे मिटायला लागले, शरीर गार पडू लागलं तर हे लो बीपीची लक्षणं आहेत. तर त्याच्याशी सतत बोलत राहा, त्याला जागं ठेवा म्हणजे त्याचा बीपी नियंत्रणात राहिल. त्याला रिधमिक कॉफ म्हणजे मधून मधून खोकायला सांगा. म्हणजे खोकल्याने बीपी थोडा वर राहतो. हॉस्पिटलमध्ये जिवंत जाण्याची शक्यता या एका छोट्या फर्स्ट एडमुळे शक्य असते, असं डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले.
advertisement
हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 5 संकेत
1. छातीत दुखणं किंवा जळजळ
जर तुमच्या छातीत वारंवार सौम्य दुखणं जाणवत असेल किंवा छातीत जळजळीसारखं काहीतरी वाटत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे हृदयविकाराच्या झटक्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अशावेळी तातडीने ECG आणि हृदयाशी संबंधित चाचण्या करून घ्या.
2. सतत थकवा व कमजोरी जाणवणं
advertisement
काम केल्यानंतर थकवा येणं स्वाभाविक आहे. पण जर कोणतंही विशेष शारीरिक श्रम न करता सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर ते काळजीचं कारण आहे. हे लक्षण विशेषतः महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतं.
advertisement
3. श्वास घेण्यात अडचण
जर तुम्हाला थोडं चालल्यानंतर किंवा जिने चढल्यानंतर दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, तर याची दखल घ्या.
हे लक्षण हृदयाचे कार्य व्यवस्थित नसल्याचे संकेत देतं.
4. अत्यधिक घाम येणं
थंड हवामान असतानाही जर तुमचं अंग सतत घामानं भिजतं असेल, किंवा कोणतीही मेहनत न करता घाम येत असेल, तर हे लक्षण हृदयविकाराशी संबंधित असू शकतं. अशावेळी डॉक्टरी सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
5. अपचन किंवा मळमळ
काही वेळा हार्ट अटॅकचा त्रास पोटदुखी, मळमळ किंवा अपचन अशा स्वरूपातही जाणवतो. खास करून वृद्ध आणि महिलांमध्ये हे लक्षण वेगळ्या पद्धतीनं दिसू शकतं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : हार्ट अटॅक येतोय असं वाटलं तर काय करायचं? पुण्याच्या हार्ट एक्सपर्ट्सनी सांगितला उपाय


