मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं...
अजित पवारांचा अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हे खूप दुःखदायक आहे. जेव्हा विमान खाली उतरत होतं, तेव्हा ते कोसळेल असं वाटलं आणि ते कोसळलंच. त्यानंतर त्यात स्फोट झाला. एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर आम्ही धावतच इथं आलो आणि पाहिले की विमानाला आग लागली होती. अखेरच्या 10 मिनिटात विमानात पुन्हा चार ते पाच स्फोट झाले, असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.
advertisement
अजित पवार विमानात होते
आणखी लोक येथं आले आणि विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आग खूप मोठी असल्याने लोकांना मदत करता आली नाही. अजित पवार विमानात होते आणि ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दांत वर्णन करू शकत नाही, असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.
100 फुटांवरुन विमान कोसळलं
विमानाला लागलेली आग इतकी रौद्र होती की, स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी हतबल झाले होते. प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, "आम्ही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या ज्वाळा आणि सतत होणारे स्फोट यामुळे कोणालाही विमानाच्या जवळ जाणे शक्य झाले नाही. त्यातच आम्हाला कळलं की या विमानात खुद्द अजित दादा आहेत... हे सांगतानाही आम्हाला शब्द सुचत नाहीत. वैमानिकाने लँडिगचा प्रयत्न केला असेल पण ते झालं नाही. धावपट्टीवर उतरेल असं वाटत असतानाच जवळपास 100 फुटांवरुन ते कोसळले."
अपघाताचे नेमकं कारण काय?
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
