या व्हिडिओमधून ही घटना किती भीषण होती, हे पाहायला मिळतं. घटनास्थळी आगीचे लोट आणि लोकांची गर्दी दिसत आहेत. विमानाचा पूर्णपणे चुराडा झाला असून अवशेष विखुरलेले दिसत आहेत. या घटनेनंतर घटनास्थळीच लोकांनी मोठमोठ्याने रडत आक्रोश केला.
अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Crash: वाईट झालं, लोक रडायला लागले; विमान क्रॅश घटनास्थळावरचं ह्रदयद्रावक दृश्य
