घटनेची माहिती अशी की, खेड तालुक्यातील २८ वर्षीय तरुणी प्राजक्ताने भटक्या समाजातील तरुण विश्वनाथ गोसावी याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तिच्या कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी नवदाम्पत्याला शोधून काढले आणि त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे जबरदस्तीने अपहरण केले.
या घटनेनंतर, पोलिसांनी तत्काळ दखल घेत मुलीच्या अपहरणासाठी व मारहाणीसाठी जबाबदार असलेल्या १५ जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मुलीची आई आणि दोन भावांचाही समावेश होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सोमवारी रात्रीच अपहरण झालेल्या प्राजक्ताला ताब्यात घेतले आणि तिला तिच्या पतीकडे सुपूर्द केलं.
advertisement
या प्रकरणी खेड पोलिसांनी आज मुलीची आई आणि तिच्या दोन भावांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय जखमी तरुण विश्वनाथ गोसावी याचं प्राजक्ता नावाच्या एका २८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी इथं वैदिक पद्धतीने विवाह केला होता. पण हे लग्न मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हतं. याच कारणातून ३ ऑगस्ट रोजी विश्वनाथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये मुलीच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांचा समावेश होता.