पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट विशेष
या मार्गावर 20 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक 01491 पुणे-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट विशेष सेवा 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुणे स्थानकावरून सायंकाळी 17:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 20:00 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक 01492 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री 21:25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 23:55 वाजता पुणे येथे पोहोचेल.
advertisement
Pune Metro: पुणे मेट्रोला बाप्पा पावला! प्रवासी संख्येत तिपटीने वाढ, गणेशोत्सवात विक्रमी कमाई
कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक विशेष
या मार्गावर देखील 20 विशेष फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 01418 कोल्हापूर-मुंबई सीएसएमटी सेवा 24 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी रात्री 22:00 वाजता कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13:30 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01417, सीएसएमटी-कोल्हापूर, 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 14:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:20 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
पुणे-सांगानेर जंक्शन-पुणे सुपरफास्ट विशेष
या मार्गासाठी देखील 20 विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक 01433, पुणे-सांगानेर जंक्शन, 24 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी सकाळी 9:45 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:40 वाजता सांगानेर जंक्शन येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक 01434 सांगानेर-पुणे विशेष, 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी सकाळी 11:35 वाजता सुटेल.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण 10 सप्टेंबरपासून खुले होणार आहे. प्रवासी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावरून तिकीट बुक करू शकतील. गाडी क्रमांक, थांबे, वेळापत्रक आणि भाड्यांबाबत सविस्तर माहिती प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत www.enquiry.indianrail.gov.in या पोर्टलवर मिळणार आहे.
दरवर्षी दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असे. गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी, आरक्षणातील अडचणी आणि प्रतीक्षायादीमुळे अनेकांना अडचणीतून जावे लागत होते. मात्र, यावर्षी मध्य रेल्वेने 454 विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांचा मोठा दिलासा होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असून, गर्दीही नियंत्रित होण्यास मदत होईल.