TRENDING:

अरे संसार संसार...! पुण्यातील दाम्पत्यानं भाकरीवर मिळवून दिला अनेक महिलांना रोजगार

Last Updated:

ते घरी बनवलेली भाकरी विकतात आणि त्यातून हजारो रुपये कमवतात. दिवसाला 1000 भाकऱ्या बनवल्या तर सर्व खर्च वगळून महिन्याकाठी 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : आजकाल विविध पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड दिली जाते. तरच त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. शिवाय सध्याच्या धावपळीच्या जीवनात घरचं सकस अन्न खाण्यासाठीही लोक पैसे मोजतात. हीच बाब लक्षात घेऊन उत्तम चवीच्या घरगुती पदार्थांचा व्यवसाय केल्यास त्यातूनही चांगला नफा मिळू शकतो. हीच कल्पना सत्यात उतरवली कदम दाम्पत्यानं. ते चक्क घरी बनवलेली भाकरी विकतात आणि त्यातून हजारो रुपये कमवतात. महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायातून त्यांनी अनेक महिलांना रोजगारही मिळवून दिलाय.

advertisement

चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलजवळ गेली अनेक महिने ते हा व्यवसाय करत आहेत. दिवसाला 1000 भाकऱ्या बनवल्या तर सर्व खर्च वगळून त्यांना महिन्याकाठी 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. तांदळाची उकड घेऊन बनवलेल्या अगदी घरगुती चवीच्या या भाकऱ्या असतात, म्हणूनच त्यांना मोठी मागणी मिळते.

हेही वाचा : गृहिणी होऊ शकते यशस्वी व्यावसायिक! 'ती'च्या हातची चव नवी मुंबईत लोकप्रिय

advertisement

'या व्यवसायाची सुरूवात आम्ही 2 वर्षांपूर्वी केली होती. सुरूवातीला एका हॉटेलमध्ये चपाती आणि भाकरीचा पुरवठा करायचो. पुढे मागणी वाढत गेल्यावर व्यवसाय विस्तारला. आता 8 सी फूड रेस्टॉरंटमध्ये पुरवठा करतो. तसं पाहिलं तर भाकरी सहज कुठेही मिळते, मात्र आमच्याकडील भाकरी उकड घेऊन बनवलेली असते. ही वेगळी कॉन्सेप्ट लक्षात घेऊनच व्यवसायाची सुरूवात केली', असं आकांक्षा कदम यांनी सांगितलं.

advertisement

त्या पुढे म्हणाल्या, 'आता जवळपास दिवसभरात 800 ते 1000 भाकऱ्या बनवल्या जातात. त्यासाठी 10 ते 11 महिला काम करतात. 1 भाकरी 15 रुपयांपर्यंत विकली जाते. भाकरीसाठी लागणारे तांदूळ मुंबईहून मागवतो. त्यामुळे सर्व खर्च वगळून महिन्याला साधारण 35 ते 40 हजार रुपयांचा नफा होतो', अशी माहिती आकांक्षा कदम यांनी दिली. दरम्यान, चांगल्या दर्जाचे घरगुती पदार्थ विकून आपण चांगला व्यवसाय करू शकतो तसंच गृहिणीसुद्धा व्यावसायिक होऊ शकतात, हा संदेश यातून घेण्यासारखा आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
अरे संसार संसार...! पुण्यातील दाम्पत्यानं भाकरीवर मिळवून दिला अनेक महिलांना रोजगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल