शिरीष महाराज मोरे यांनी मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास आत्महत्या केली. अखेर आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आई, वडिल आणि पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे. शिरीष महाराजांना चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांमध्ये एक चिट्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी लिहिली होती. नुकताच त्यांचा टिळाही झाला होता. एप्रिल- मे महिन्यात लग्नाचं नियोजनही करण्यात आलं होतं. पण त्याआधीच त्यांनी आपलं जीवन संपवलं.
advertisement
माझी लाडाची पिनू, प्रियंका,
खरंतर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती न मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागलो मला माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा. तुला न्याय नाही देऊ शकतो. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहण्याऱ्या माझ्या सखे माझ्या चांगले वेळेची हकदार होतीस तू. माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय.
कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं. सगळंच तर राहीलं. मी काहीही न देता सुद्धा माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. खूप गोड आहेस तू. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल पण जप स्वत:ला एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट, आता work from home हो, खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर...
तुझाच अहो...