पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांमध्ये मात्र, पावसाचा जोर ओसरला आहे. तर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात उद्या पावसाची काय परिस्थिती असेल, हे जाणून घेऊयात.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस मुंबई सह उपनगरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या मुंबईत कमाल 32°C तर किमान 22°C तापमान असेल.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात 30 ते 40 किमी/ताशी वेगाने वारे वाहणाऱ्या संभाव्य वादळाचा इशारा देण्यात आला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. पुण्यात उद्या कमाल 32°C तर किमान 20°C तापमान असेल.
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत, दगडूशेठ गणपतीचेही घेतले दर्शन, म्हणाला…., VIDEO
मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागांत पावसाने हजेरी लावली. बीड, जालना, परभणी, संभाजीनगर या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असेल. तर काही भागात हलक्याशा सरी कोसळतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल 32°C तर किमान 25°C तापमान असेल.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभगाच्या अंदाजानुसार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये उद्या कमाल 35°C तर किमान 26°C तापमान असेल.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, धाराशिवमध्ये ड्रोनद्वारे फवारणी; खर्च आणि वेळ, दोघांची होतेय बचत
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.





