ना घर, ना जमीन, ना शिक्षण, ना आधार कार्ड अशा परिस्थितीत ते जगतात. एकविसाव्या शतकात अगदी 2023 साली देखील हा संघर्ष करणाऱ्या समाचाचं नाव आहे पोतराज. काय आहे या समाजाचं वास्तव? तो अजुनही दुर्लक्षित कसा राहिला? त्यांच्या समस्या काय आहेत? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर प्रथमच झालं होतं ध्वजारोहण, जंगल सत्याग्रहाशी आहे संबंध
advertisement
पुण्यातल्या कोंढवा खडी मशीन चौक या ठिकाणी पोटराज समाजाची एक छोटी वस्ती आहे. कोणालाही सहसा दिसणार नाही किंवा जाता येणार नाही अशी ही एका डोंगराला लागून ही वस्ती आहे. पिण्याचं पाणी, वीज, शिक्षण अशी कोणतीही व्यवस्था या वस्तीत नाही. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, पण शिक्षणाचा खर्च झेपणार नाही असं ते सांगतात.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘पुण्यात राहणाऱ्या या लोकांना काही भागात कडकलक्ष्मी, काही भागात पोतराज तर काही ठिकाणी मरियमवाले म्हणतात. महाराष्ट्रात याचा विमुक्तांच्या तर मध्य प्रदेशात एसटी वर्गात यांचा समावेश होतो.
कोल्हापूरात 15 ऑगस्टला रिचवल्या जातात लाखो जिलेब्या? काय आहे यामागील कारण?
‘आमच्या पोरांचं चांगले झाले तर आम्हाला पुढे जाऊन स्वतः ची ओळख निर्माण करता येईल. गेल्या पंचवीस वर्षा पासुन आम्ही याच ठिकाणी पाल ठोकून आहोत. ही जागा देखील भाड्याची आहे. आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, इथून सरकारी शाळा लांब आहेत. बस किंवा वाहनाचा खर्च आम्हाला झेपत नाही. जोगवा मागायला गेलं तरच रात्री खायला मिळतं, असं वास्तव या वस्तीत राहणाऱ्या सीताबाई निंबाळकर यांनी सांगितलं.
आम्ही आमच्या देवीला मानतो पूर्वी पासून देवीला घेऊन भिक्षा मागण्याची परंपरा आमची आहे. पण आता आमच्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं एवढंच वाटतं. आम्हाला बाहेर कुठे गेल तर काम मिळणं पण अवघड होतं आणि हातावरचं पोट असल्यानं रोज भिक्षा मागायला जावं लागत असल्याचं,’ एका पोतराजानं स्पष्ट केलं.
लांब केस , कपाळावर हळद कुंकुम, कमरेला घुंगरू पट्टा, रंगीबेरंगी कापडे उघड्या अंगावर आणि हातात एक लांब चाबूक असलेला असे यांचे जिवन पण त्यांच्या चिमुरड्यांना शिक्षण मिळावे यासाठीची त्यांची धडपडत मन गहिवरून टाकते. त्यांचा हा संघर्ष कधी संपणार हा प्रश्न आजही कायम आहे.