पुणे : पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळच्या गुंडगिरीमुळे त्याचा भाऊ सुद्धा आता अडचणीत सापडला आहे. पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळ याच्यासह आता सचिन घायवळवर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सचिन घायवळला सुद्धा कोथरूड पोलिसांनी आरोपी केलं आहे. त्यामुळे दोघा भावांचा पोलिसांनी चांगलाच करेक्ट कार्यक्रम केला आहे.
advertisement
कोथरूडमध्ये एका व्यक्तीवर घायवळच्या टोळीने क्षुल्लक कारणातून गोळीबार केला होता. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगवर धडक कारवाई सुरू केली. अशातच निलेश घायवळ हा पासपोर्टमध्ये हेराफेरी करून लंडनला पळून गेला. त्यानंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ हा पिस्तुल परवाना प्रकरणात सापडला. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळ याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
निलेश घायवळ याच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी सचिन घायवळ याला देखील आरोपी केलं आहे. आधी निलेश घायवळ याच्यासह त्याच्या साथीदारांवर कोथरूड गोळीबार प्रकरणी मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच गुन्ह्यात सचिन घायवळ याला देखील मोका लावण्यात आला आहे.
सचिन घायवळ गुन्हेच गुन्हे दाखल
दरम्यान, पिस्तुल परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळचा सख्खा भाऊ आणि कुख्यात गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला होता. या परवान्यास पोलिसांचा विरोध असूनही कदमांनी शस्त्र परवाना दिला होता. घायवळ याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंद नाही म्हणून त्यांना मी शस्ञ परवाना दिला, असा बचाव योगेश कदमांनी केला होता. पण सचिन घायवळवर गुन्ह्याची यादीच समोर आली आहे.
महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (मोक्का) निलेश घायवळ गँगच्या प्रमुख सचिन घायवळ सदस्य म्हणून गुन्हेगारी कारवाईमध्ये सहभाग.पप्पू ऊर्फ सचिन कुडले खून प्रकरणात आरोपी क्रमांक ३ (अपील क्रमांक २५/२०१४ पुणे (स्पेशल कोर्ट) २०१४ बॉम्बे हायकोर्ट अॅपील तपास चालू)
खुनाचा प्रयत्न शत्रू गँगविरुद्ध हल्ले आणि धमक्या. निलेशच्या टोळीशी जोडलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग.पुणे शहर (कोथरूड) २०१०-२०१५ (जुने केसेस; पुरावे सुरू)
शस्त्र कायदा बेकायदेशीर शस्त्रे सोबत धरले जाणे किंवा वापरणे. याआधी दाखल गुन्हा असतानाही नवीन शस्त्र परवाना मंजूर झाल्याने वाद.पुणे २०१४-२०२५ (चालू तपास)
गुन्हेगारी कारवाया खंडणी, मारहाण आणि टोळीशी संबंधित गुन्हे. विरोधी गँगशी वैरामुळे २०१४ मध्ये दोन सदस्यांच्या खुनाशी अप्रत्यक्ष जोड. विविध (२०१०-२०२४)
२०१५ मध्ये पुणे पोलिसांनी निलेश गँगच्या १३ सदस्यांना (सचिनसह) एक वर्षासाठी शहराबाहेर हद्दपार केले. हे विरोधी गँगशी वैरामुळे झाले. अतुल कुडलेच्या तक्रारीवर घायवळ टोळीतील २६ जणांवर महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई. यात खून (IPC कलम ३०२), खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा (आर्म्स अॅक्ट) आणि संघटित गुन्हे यांचा समावेश.
आरोपी निलेश घायवळ (प्रमुख आरोपी), सचिन घायवळ (त्याचा भाऊ, आरोपी क्रमांक ३), संतोष गावडे आणि इतर २४ जण.
न्यायालयीन निकाल: फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणे स्पेशल कोर्टाने पुराव्याअभावी सर्व २६ आरोपींना निर्दोष मुक्तता दिली. निलेश घायवळ तुरुंगातून सुटला, पण बॉम्बे हायकोर्टात अॅपील (क्रमांक २५/२०१४) सुरू आहे.
संबंधित केस : हे प्रकरण सचिन घायवळच्या MCOCA केसमध्येही उल्लेखित आहे, ज्यात तो आरोपी क्रमांक ३ होता.