नेमका कोणता मार्ग असेल बंद?
28 सप्टेंबर 2025 रोजी चिंतामणी शाळा ते जिजामाता चौक या मार्गावरील रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगावा आणि नियमांचे पालन करावे. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी तात्पुरते बदल लागू करण्यात आले असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
advertisement
याबाबतची सविस्तर माहिती पुणे वाहतूक पोलीसांच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक आणि ट्विटर हँडलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही माहिती स्थानिक वर्तमानपत्रांतूनही नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.वाहतुकीवरील मर्यादा केवळ दुरुस्तीच्या कामामुळेच लावण्यात आल्या असून काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना या रस्त्यावरील बंदोबस्त लक्षात घ्यावा.
दरम्यान या रस्त्यावरील दुरुस्तीमुळे कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभाग विशेष पथक नियुक्त करणार आहे. हे पथक पर्यायी मार्गांवर वाहनचालकांना दिशा दाखविण्याचे काम करेल. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे.