राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी..
माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असं निलेश घायवळची आई म्हणाली आहे.
advertisement
सोनेगावच्या जिल्हा परिषदतून...
अहमनगर जिल्ह्यातील सोनेगावच्या जिल्हा परिषदतून निलेश उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं वार काढू दिलं जात नव्हतं, असं निलेश घायवळच्या आईने म्हटलं आहे. त्यामुळे त्याला त्रास दिला जात होता, असं म्हणत निलेश घायवळच्या आईने अहमदनगरमधील कर्जत जामखेडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
दोन्ही भावांना राजकारणात उतरायचं होतं
दरम्यान, दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, असंही निलेश घायवळच्या आईने म्हटलं आहे.