TRENDING:

Passport: पासपोर्टसाठी चकरा मारण्याची गरज नाही! पुण्यातील इथं 3 दिवसांचा कॅम्प, लगेच करा ऑनलाईन नोंदणी

Last Updated:

Passport Application: पासपोर्ट काढण्यासाठी बऱ्याचदा नागरिकांना चकरा माराव्या लागतात. पुण्यतील नारायणगाव येथे 3 दिवसांचा पासपोर्ट मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकारातून आणि पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने नारायणगाव (ता. जुन्नर) येथे 10 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत पासपोर्ट मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी विशेष मोबाईल व्हॅनद्वारे पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा मेळावा नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंगल कार्यालयात होणार असून, परिसरातील नागरिकांना पासपोर्टसाठी अर्ज, कागदपत्रांची पूर्तता आणि संबंधित प्रक्रिया अधिक सुलभतेने पूर्ण करता येणार आहे.
Passport: पासपोर्टसाठी चकरा मारण्याची गरज नाही! पुण्यातील इथं 3 दिवसांचा कॅम्प, लगेच करा ऑनलाईन नोंदणी
Passport: पासपोर्टसाठी चकरा मारण्याची गरज नाही! पुण्यातील इथं 3 दिवसांचा कॅम्प, लगेच करा ऑनलाईन नोंदणी
advertisement

पासपोर्ट सेवांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

नारायणगाव येथील पासपोर्ट मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी आधी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी https://passportindia.gov.in या संकेतस्थळावर New User Registration करून नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी यांसारखी माहिती भरावी. नोंदणीनंतर लॉग-इन करून Apply for Fresh Passport किंवा Re-issue of Passport हा पर्याय निवडता येईल. अर्ज करताना पत्ता, शैक्षणिक पात्रता, आपत्कालीन संपर्क माहिती आदी तपशील नीट भरावेत आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

advertisement

Ration: तुम्ही रेशनचं धान्य घेतलं का? पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण सुरू, शेवटची तारीख कधी?

ऑनलाइन अपॉइंटमेंट कशी घ्यावी?

  1. अर्ज सादर केल्यानंतर Pay and Schedule Appointment हा पर्याय निवडा.2. येथे ‘आरटीओ पुणे जुन्नर मोबाइल व्हॅन’ हे स्थान निवडा.3. नेटबँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करा.
  2. 4. उपलब्ध तारीख आणि वेळ निवडून अपॉइंटमेंट निश्चित करा.

    advertisement

अपॉइंटमेंटच्या ठरलेल्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे आणि स्वयं-प्रमाणित छायाप्रती घेऊन नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंगल कार्यालय येथे हजर राहावे. येथे कागदपत्रांची तपासणी, बायोमेट्रिक माहिती संकलन आणि काही प्रकरणांमध्ये मुलाखत घेण्यात येईल. अर्जाच्या प्रकारानुसार आणि सध्याच्या पत्त्यावर आधारित पोलीस पडताळणी आवश्यक असू शकते.

मराठी बातम्या/पुणे/
Passport: पासपोर्टसाठी चकरा मारण्याची गरज नाही! पुण्यातील इथं 3 दिवसांचा कॅम्प, लगेच करा ऑनलाईन नोंदणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल