Ration Card News: तुम्ही रेशनचं धान्य घेतलं का? पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण सुरू, शेवटची तारीख कधी?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ration: पिंपरी चिंचवडमधील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन धान्य वाटप सुरू झालं असून 253 दुकांनातून धान्य वितरण सुरू आहे.
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत 1 सप्टेंबरपासून धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना गोंधळ टाळून, वेळेत रेशन घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. हे धान्य वाटप 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असून, सोमवार वगळता इतर सर्व दिवसांत रेशन वितरण करण्यात येणार आहे. शहरातील निगडी, पिंपरी आणि भोसरी विभागांमध्ये रेशन दुकानाची विभागली करण्यात आली आहे.ज्यामुळे नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने धान्य मिळण्यास मदत होईल.
धान्याचा 100 टक्के साठा उपलब्ध
पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्याचे वितरण सुरू आहे. शहरातील तीन झोनमध्ये एकूण 253 रेशन दुकाने कार्यरत आहेत. यात ‘अ’ झोनमध्ये 90, ‘ज’ झोनमध्ये 77 आणि ‘फ’ झोनमध्ये 86 दुकानांचा समावेश आहे. शहरातील अत्यंत गरीब गटातील (अंत्योदय) 3,710 शिधापत्रिकाधारकांसह अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 88,641लाभार्थ्यांना यंदा सप्टेंबर महिन्यात धान्य दिले जाणार आहे. या दोन्ही गटांसह एकूण 4,89,387 लाभार्थ्यांना सुविधा मिळणार आहे.प्रशासनाने नागरिकांना गोंधळ टाळण्याचे आवाहन केले असून, धान्याचा 100 टक्के साठा उपलब्ध आहे.
advertisement
धान्य वितरणासाठी लाभार्थीची उपस्थिती आवश्यक
धान्य घेण्यासाठी संबंधित लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. लाभार्थींनी आपली शिधापत्रिका (राशन कार्ड) बरोबर आणावी. काही ठिकाणी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र तपासणीसाठी मागवले जाऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवावी.
advertisement
धान्य घेताना नोंदी बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. नागरिकांनी ठरवलेल्या वेळेतच धान्य उचलावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी शहरातील ज झोन विभागाचे अधिकारी प्रदीप डांगरे यांनी सांगितले की, शहरातील धान्याचा पुरवठा पूर्णपणे 100% उपलब्ध आहे. लाभार्थींनी घाई न करता, 30 सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत आपले धान्य उचलावे. सर्व रेशन दुकाने सोमवार वगळता इतर दिवशी नियमितपणे चालू राहणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 09, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ration Card News: तुम्ही रेशनचं धान्य घेतलं का? पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण सुरू, शेवटची तारीख कधी?









