चूक कुणाची? दुचाकीस्वार, रिक्षा की महामार्ग? कार डिव्हायडरला धडकली अन्..,बुलडाण्यातला VIDEO

Last Updated:

बुलडाणा जिल्ह्यातील मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला लागून असलेल्या सर्विस रोडवर खामगाव शहरात कारचा भीषण अपघात झाला

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा: महामार्गावर वाहन चालवत असताना शिस्त पाळण्याची गरज आहे, पण अनेक वेळा बेफामपणे वाहन चालवणारे महाभाग आपल्याला सर्रास पाहण्यास मिळतात. अशा वाहनचालकांमुळे नाहक इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. एका रिक्षाला वाचवण्याच्या नादात भरधाव कार डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील  मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला लागून असलेल्या सर्विस रोडवर खामगाव शहरात कारचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करणाऱ्या ऑटो रिक्षाला वाचवताना भरधाव चारचाकी डिव्हायडर ला जाऊन धडकली आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, महामार्गावर एका रिक्षा चालला होता. त्याचवेळी महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलसमोर एक दुचाकीस्वार निघाला होता. दुचाकीवर दोन जण स्वार होते. दुचाकी महामार्गावर थेट आली. त्यामुळे रिक्षाचालकाने रिक्षा बाजूला वळवला. त्याचवेळी पाठीमागून एक भरधाव कार आली. अचानक समोर रिक्षा वळल्यामुळे कार चालकाने धडक होऊ नये म्हणून कार थेट डिव्हायडरवर चढवली.
advertisement
डिव्हायडरला कार धडकल्यानंतर समोरील चाक निखळलं आणि कार महामार्गावर उलटली. या विचित्र अपघातात कार पूर्णपणे उलटून कारचे प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने कारमध्ये असलेल्या दोघांचे प्राण थोडक्यात वाचले आहे. पण, कार उलटल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली होती. पण, अपघातास कारणीभूत असलेला दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झालाा. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चूक कुणाची? दुचाकीस्वार, रिक्षा की महामार्ग? कार डिव्हायडरला धडकली अन्..,बुलडाण्यातला VIDEO
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement