खरं तर नवी कोरी गाडी घेणे म्हणजे प्रत्येकासाठीच आनंदाचा क्षण असतो. कारण कार चालकापासून त्यांच्या घरच्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती या नवीन पाहूण्याच्या आगमनासाठी सज्ज असतो.पण या घटनेत खूपच आक्रित घडलं आहे. त्याचं झालं असं की नवीन कोरी गाडी खरेदी केल्यानंतर गाडीचा मालक घराकडे निघाला होता. पण गाडी शोरूमधून काढताच मोठा अपघात झाला होता.पण सुदैवाने या घटनेत गाडीतील सगळेजण बचावले आहेत.
advertisement
त्याचं झालं असं की नवीन चारचारी घेतल्यानंतर गिअर आणि ब्रेकचा अंदाज न आल्याने फोर व्हीलर थेट सुस्साट मिळाली तिने वेगात दुभाजक देखील ओलांडलं आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली. विशेष म्हणजे या घटने दरम्यान सुदैवाने कोणत्याही वाहनाला धडक बसली नाही.त्यामुळे मोठा अपघात टळला.पण कार दुभाजकाला आपटून पुढे गेल्याने नव्या कोऱ्या कारचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.पण या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भोसरी येथील शो रूमधील ही घटना आहे.या घटनेची चर्चा सर्वत्र सूरू आहे.
वर्गणी मागायला गेलेल्या तिघांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराजे मित्र मंडळाचे तीन सदस्य, सचिन ओव्हाळ, अजय ठोंबरे आणि शुभम गायकवाड हे रात्री 12 वाजता पिंपळे सौदागर येथील गणेशम सोसायटी फेज-2 च्या गेटवर दुचाकीवरून आले. त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घालत ‘आम्हाला आत प्रवेश करू द्या, गेट बंद करू नका,’ असा दम दिला. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या चेअरमन यांना जबरदस्तीने 3500 रुपये वर्गणी देण्यास सांगितले. त्यांनी वर्गणीच्या पावतीवर आपला मोबाईल क्रमांक लिहून ‘फोन-पे’ द्वारे पैसे देण्यास सांगितले.
‘जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर आम्ही उद्या पुन्हा याच वेळेस येऊ,’ अशी धमकीही त्यांनी दिली. अखेरीस, त्यांनी चेअरमन यांच्याकडून 1000 रुपये जबरदस्तीने घेतले आणि ते निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८, ३०८ (३) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल करून या तिघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.