TRENDING:

Pimpri News: आता पिंपरी-चिंचवडमध्ये मिळणार स्वस्तात धान्य, 7 दुकाने सुरू होणार, पाहा कुठं?

Last Updated:

Pimpri News: पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीनंतर शहरात 7 स्वस्त धान्याची दुकाने सुरू होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरी भागातील नव्या वस्त्यांमधून वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, दिवाळीनंतर पुणे-पिंपरी परिसरात आणखी सात नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला असून मंजुरीनंतर दुकाने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या नव्या दुकानांमुळे शहरातील एकूण स्वस्त धान्य दुकानांची संख्या आता 260 वर पोहोचणार आहे.
News18
News18
advertisement

जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अलीकडच्या काही वर्षांत नवीन वसाहती वाढल्या आहेत. त्याठिकाणी अद्याप पुरेसे स्वस्त धान्य वितरण केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांना दुसऱ्या भागात जावे लागत होते. हाच विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या दुकानांच्या मंजुरीची प्रक्रिया गतीमान केली आहे.

काय सांगता! आता आयटीआयमध्ये मिळणार मंत्रोच्चाराचे धडे, शैक्षणिक पात्रता काय?

advertisement

नवीन स्वस्त धान्य दुकाने कुठे सुरू होणार?

डांगे चौक गणेशनगर,काळाखडक

रहाटणी,रामनगर

पिंपळेनिळख गावठाण

मामुर्डी, शितोळेनगर

वैभवनगर, तपोवन मंदिर रोड, पिंपरी गाव

विनी चर्चजवळ, गणेशनगर, दापोडी

जय शंकर मार्केट, चिंचवड स्टेशन

पिंपरी चिंचवडमध्ये एकूण किती लाभार्थी

पिंपरी चिंचवड शहरामध्ये रेशन विभागाचे एकूण तीन मुख्य विभाग आहेत. त्यात निगडी अ, पिंपरी ज आणि भोसरी फ या विभागांचा समावेश आहे. या तिन्ही विभागांमध्ये एकूण 4,89,387 लाभार्थी आहेत. त्यात 3,710 अंत्योदय आणि 88,641 अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांना दिवाळीनंतर महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pimpri News: आता पिंपरी-चिंचवडमध्ये मिळणार स्वस्तात धान्य, 7 दुकाने सुरू होणार, पाहा कुठं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल