मिळालेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्ही पाहता, दुचारीस्वार आपला दुचाकी घेऊन चालला होता. इतक्यात मागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने थेट दुचाकीस्वाराला चिरडलं होतं. या अपघातात दीपक साई या 28 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला होता. हा तरूण नेपाळी होता आणि कोणत्या तरी कामानिमित्त तो घराबाहेर पडला होता, यावेळी त्याला मृत्यूने गाठलं.
advertisement
देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर आज सकाळी हा भीषण अपघात घडला होता. अशा अपघातानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतात. मात्र या घटनेत अपघातानंतर तासभर मृतदेह रस्त्यातच पडून होता, असा आरोप होतोय.त्यामुळे देहूरोड पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान हायवेवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जातात आणि याच रस्त्यावरून शाळांची वाहतूक तसेच रहिवाशांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत भरधाव ट्रक येणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं मत अनेक रहिवाशांनी व्यक्त केलं आहे.
ओव्हरटेक करायच्या नादात तिघांचा जीव गेला
पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत ओव्हरटेक करायच्या नादात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.ट्रक आणि टॅकरचा भीषण धडक झाली आहे. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शांताबाई वाजे (आई), ज्ञानेश्वर वाजे ( मुलगा), युवांश वाजे ( नातू) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.त्यामुळे वाजे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने शिरूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दूध टॅकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दूध वाहतूक करणारा टँकर भरधाव वेगाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान दूध टॅकरने ट्रकला पाठीमागून धडक होती. या अपघातात दुध गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला.
कवठे गावाजवळील कुटुंबातील वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी येत असताना बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघाती दुदैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर वाजे आणि युवांश वाजे अशा या बापलेकाचे नाव आहे. आणि शांताबाई वाजे असे या वृयोवृद्ध आजीचे नाव आहे. या घटनेने वाजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शिरूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.