खडकवासला धरणातून होत असलेली पाण्याची गळती, चोरी थांबवण्यासाठी हा बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला होता. पुणे पर्यावरण मंडळाने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिल्याचं पत्र जलसंपदा विभागाला दिलं आहे. हैदराबाद येथील एका कंपनीला काम देण्यात आले असून, पुढच्या अडीच वर्षांत हे काम पूर्णत्वास जाईल.
ना डिझेल, ना CNG, पुण्यात धावणार खास बस, चक्क पाण्यापासून बनवणार इंधन, चाचणी सुरू
advertisement
ब्लास्टिंग परवानगी घेऊन कामाला सुरुवात
पोलीस खात्यासह इतर अनेक खात्यांची परवानगी ब्लास्टिंगसाठी घेण्यात आलेली आहे. कंपनीने आर एम सी प्लांट, क्रशर आणि प्रयोगशाळा सुरू केली आहे. आता सुरू झालेल्या कामावर ‘क्वालिटी युनिट कंट्रोल’ लक्ष ठेवत आहे. बोगदा करताना आवश्यक त्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
कामासाठी एकूण 150 कर्मचारी
बोगद्याचे काम पहिल्या टप्प्यात वडाची वाडी ते उरुळी देवाची इथे सुरू झालं. कात्रज आणि धायरी भागात दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल. हैदराबाद येथील कंपनीने या कामासाठी दीडशे कर्मचारी पुण्यात नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये इंजिनिअरपासून ते प्रकल्प व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.