आडमुठेपणा करू नका...
कात्रज परिसरात पाहणीदरम्यान, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या नेत्यांनी महावितरण आणि पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचं पहायला मिळालं. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत "आडमुठेपणा करू नका, कामे मार्गी लावा," अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
अधिकाऱ्याला फोन लावला अन्...
advertisement
"लागलं तर नवीन सब-स्टेशन उभारा, पण नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत करा," असे आदेश दिले गेले. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नागरिकांच्या समोरच महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन लावला अन् स्पष्टीकरण मागितलं. तसेच समस्येचं निवारण करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत.
लागलीच सब-स्टेशन उभारा, अजित पवारांचे निर्देश
पुणे महानगरपालिकेकडून (PMC) सब-स्टेशन उभारण्यासाठी तातडीने जागा मंजूर करून घेतली. "लागलीच सब-स्टेशन उभारा आणि सर्व कामे त्वरित पूर्ण करून घ्या," असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्याकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात देखील पाहणी झाली. वारजे - शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील हा शिवने पूल सगळ्यात आधी पाण्याखाली जातो. याच शिवणे पुलाची उंची वाढवण्यासाठी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.