Pune : पुण्यात नागरिकांचा मंदिरात येण्यासाठी हट्ट, दादांनी थेट हात जोडले, म्हणाले 'मला देव देव करायला...'

Last Updated:

Ajit Pawar Angry On Citizens : अजित पवार पुण्यातील आहिरेगावात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पहाटे पहाटे पोहोचले होते. त्यावेळी दादांसमोर कामाचा तक्रारीची सरबत्ती लावली होती.

Ajit Pawar Pune Daura Angry
Ajit Pawar Pune Daura Angry
Pune Ajit Pawar Daura : नित्यनियमाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून दौरा सुरु झाला. पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात केली. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी थेट नागरिकांसमोर हात जोडल्याचं पहायला मिळालं.

दादांनी नागरिकांपुढे हात जोडले

अजित पवार पुण्यातील आहिरेगावात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पहाटे पहाटे पोहोचले होते. त्यावेळी दादांसमोर कामाचा तक्रारीची सरबत्ती लावली. त्यावेळी आढावा घेताना दादांनी नागरिकांपुढे हात जोडल्याचं पहायला मिळालं. आहिरेगावात असलेल्या मंदिरात असलेले पुजारी आणि स्थानिक नागरिक मंदिरात अजित पवार यांना मंदिरात येण्यासाठी हट्ट करत होते. त्यावेळी अजित पवार काहीसे संतापल्याचं पहायला मिळालं.
advertisement

एक तर मला देव देव करायला...

अजित पवार आहिरेगावातील नागरिकांसमोर हात जोडून म्हणाले, मी पहाटे पाच वाजता उठतो, एक तर मला देव देव करायला लावा किंवा विकास करायला सांगा. एवढं बोलल्यानंतर अजित पवार निघून गेले. त्यावेळी रुपाली चाकणकर देखील तिथं उपस्थित असल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

पाहा Video

नांदेड सिटी परिसरात पाहणी

अजित पवार यांच्याकडून धायरी आणि नांदेड सिटी परिसरात देखील पाहणी झाली. वारजे - शिवणे पुलाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील हा शिवने पूल सगळ्यात आधी पाण्याखाली जातो. याच शिवणे पुलाची उंची वाढवण्यासाठी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात नागरिकांचा मंदिरात येण्यासाठी हट्ट, दादांनी थेट हात जोडले, म्हणाले 'मला देव देव करायला...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement