पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक मुस्लिम नागरिकांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. मात्र, या सर्व गोंधळापूर्वी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधानं केली होती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
दरम्यान, या घटनेनंतर ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आलीये. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे लक्ष लागलं आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेवर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. हा मुद्दा आणि परिसर अत्यंत संवेदनशील असून, खासदारांनी अशा प्रकारे व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रयत्न आहे," अशी टीका डंबाळे यांनी केली.
"हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारा असून, यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार कुलकर्णी यांना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल, त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी केवळ स्टंटबाजी करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी," अशी मागणी राहुल डंबाळे यांनी सरकारकडे केली आहे.