पे अँड पार्क कुठं?
या योजनेंतर्गत लक्ष्मी रस्ता, नाना पेठेतील गोळ्यांचा रस्ता (फर्ग्युसन रोड), जंगली महाराज रस्ता, विमाननगर परिसरातील रस्ता, बाणेर येथील हायस्ट्रीट आणि बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद मार्ग यांचा समावेश करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावर मात्र केवळ दुचाकींसाठीच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर उर्वरित रस्त्यांवर चारचाकी वाहनांसाठीही पार्किंगची परवानगी दिली जाईल.
advertisement
Pune Metro : पुणेकरांना मिळणार खास सव्हिर्स, महामेट्रोने घेतला मोठा निर्णय
शुक्ल किती?
महापालिकेच्या प्रस्तावानुसार दुचाकी वाहनांसाठी चार रुपये तासाला आणि चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये तासाला शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्क रचना नागरिकांसाठी परवडणारी ठरेल.
महापालिकेच्या वाहतूक विभागाने मागील काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनतळ समस्या अभ्यासली होती. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी आणि रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्यासाठी ‘पे अँड पार्क’ ही योजना अत्यंत गरजेची असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत ही योजना एकदा सत्ताधाऱ्यांनी अमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही कारणांमुळे ती पूर्णपणे राबविता आली नाही. आता महापालिकेतील सध्याचे प्रशासन या योजनेला नवे रूप देत आहे.
दरम्यान, पुणे शहरातील वाढती वाहतूक आणि वाहनांच्या रांगा पाहता ‘पे अँड पार्क’ ही योजना केवळ पार्किंग सोयीसाठीच नाही तर रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आली, तर पुणेकरांना शिस्तबद्ध पार्किंगची सुविधा मिळेल आणि वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






