या कारवाईची सुरुवात पुणे शहरातून झाली. पुणे पोलिसांनी एका गांजा विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण रॅकेटची आणि त्याचा मास्टरमाईंड पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरात एक मोठी मोहीम हाती घेतली आणि संबंधित आरोपीच्या घरी धाड टाकली.
1-1 करत महिला कामगारानेच गायब केल्या दुकानातील दीड लाखाच्या साड्या; शेवटी..., पुण्यातील विचित्र घटना
advertisement
या धाडीत पोलिसांना मोठे घबाड हाती लागले. पिंपरी-चिंचवडमधील या बहाद्दर आरोपीने आपल्या घराचा वापर केवळ गांजा साठवण्यासाठी नव्हे, तर त्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड करण्यासाठी केला होता. पोलिसांना घरात गांजाची झाडे, लागवडीसाठी आवश्यक साहित्य आणि मोठ्या प्रमाणात तयार केलेला गांजा साठा आढळून आला.
या कारवाईदरम्यान पुणे पोलिसांनी सुमारे चार कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गांजाचा हा प्रचंड साठा पाहून पोलीसही चक्रावले. या संपूर्ण रॅकेटचा बादशाह असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी शोधलं आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे तुटले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईबद्दल सविस्तर माहिती आणि जप्त केलेल्या साठ्याचा तपशील जाहीर करणार आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि हा गांजा कोठून आणला गेला आणि कोठे पुरवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
