पुणे : देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल आहे. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले पवित्र समजले जाणारे असं एक जंगल आहे. हे जंगल शेकडो वर्षांपासून राखले जात आहे. देवराई हा वृक्ष संवर्धनाचा एक चांगला मार्ग आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील राबवला जातोय. तर मानव निर्मित देवराई साकारणारे रघुनाथ ढोले यांच्या कडून हा प्रकल्प नेमक काय आहे हे जाणून घेऊया.
advertisement
देवराई फाउंडेशनचा उपक्रम
मानवनिर्मित 'देवराई' आणि 'घनवन' उभारण्यासाठी विनामूल्य सहकार्य हे देवराई फाउंडेशन करत आहे. यामध्ये एक एकर जागेत 119 प्रकारच्या 515 वनस्पती आणि त्या लागवडीचा आराखडाही विनामूल्य दिला जातो. वृक्षतोड हा प्रश्न सध्या सर्वत्रच पाहायला मिळतो. यामुळे तापमानवाढीचा फटका सगळ्या जगालाच बसला आहे. मानवनिर्मित देवरायाही नष्ट होत आहेत. त्या राखण्यासाठी देवराई फाउंडेशन हे अनेकांना सहकार्य करत आहे.
अयोध्येत घुमणार पिंपरी-चिंचवडचा ‘चौघडा’; ‘या’ व्यक्तीला विशेष निमंत्रण Video
काय आहे देवराई?
देवराईचे मूळ वैदिक काळापासूनच सुरू असल्याच दिसून येते. निसर्गाप्रती श्रद्धा हाच त्याचा गाभा असल्याचे दिसून येते. देवरायांची निर्मिती, त्यांचे संवर्धन आणि अस्तित्त्व यालाही मोठी परंपरा आहे. पूर्वी पासूनच देवराई ही प्रत्येक गावामध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राणी, पक्षी यांचे वसतिस्थानही पाहायला मिळते. शक्यतो पाणी ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात असते अशा ठिकाणी या देवराई असतात. परंतु आता वाढती जंगल तोड पाहता नैसर्गिक देवराई नष्ट होत आहे. त्यामुळे मानव निर्मित देवराई फाउंडेशन मोफत देवराई करण्याचं मार्गदर्शन करत आहे.
कढई तवा अन् ग्लास, पुण्यात फक्त 10 रुपयांत मिळतायेत मातीची भांडी, Photos
शेतीच्या उत्पन्नात होते वाढ
मानव निर्मित देवराईची 20 वर्षा पूर्वी सुरुवात ही यवतमाळ या ठिकाणी झाली आहे. जसं पुस्तकांची लायब्ररी, तशी झाडांची लायब्ररी एक एकर क्षेत्रामध्ये लावू शकता. ती वाचवू शकता. त्यामधून सीड बँक तयार करता येते. त्यामधून नर्सरी देखील तयार करू शकता. देवराईमुळे शेतीचे उत्पन्न हे 30 टक्के ने वाढते. कारण मध माश्या फुलपाखरांच संवर्धन होतं. अशा देवराई मध्ये नद्या सुद्धा उगम पावल्या आहेत. परंतु आता लोकांना देवराई काय हे माहिती नाही. याचं जर जतन केलं तर जागतिक तापमान वाढ हा प्रश्न सुटेल, अशी माहिती मानव निर्मित देवराई साकारणारे रघुनाथ ढोले यांनी दिली आहे.