वाहतूक बंद राहणारे मार्ग पुढीलप्रमाणे
जंगली महाराज रोड – गरवारे ब्रिज ते गुडलक चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी जंगली महाराज रोडने सरळ पुढे खंडोजी बाबा चौकातून इच्छित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खंडोजी बाबा चौक – फर्ग्युसन कॉलेज रोड हा मार्ग बंद राहील. या ठिकाणी वाहनचालकांनी खंडोजी बाबा चौकातून डावीकडे वळून प्रभात रोडचा पर्याय निवडावा.
advertisement
झाशी राणी चौक – जंगली महाराज रोड खंडोजी बाबा चौक वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
वाहतूक विभागाने सांगितले आहे की, या कालावधीत गरवारे ब्रिज परिसरात मोठी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहर वाहतूक पोलीसांनी नागरिकांना संयम पाळण्याचे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.