कुठे आणि कधी दंड भरता येणार?
ही लोकअदालत येरवडा पोस्ट ऑफिसशेजारील वाहतूक शाखा कार्यालयात सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत भरवली जाणार आहे. नागरिकांना आपल्या नावावर असलेल्या प्रलंबित दंडाची थकबाकी मिटविण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे.
कोणते दंड सवलतीत?
सवलत खालील किरकोळ नियमभंगांसाठी लागू असेल –
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे
advertisement
सिग्नल तोडणे
वेगमर्यादा ओलांडणे
चुकीचे पार्किंग
वाहन चालविताना मोबाइलचा वापर
विना परवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
फिटनेस प्रमाणपत्र नसणे
चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
नंबरप्लेट नसणे
या सर्व प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने अनेक वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
कोणते दंड माफ नाही?
काही गंभीर गुन्ह्यांवरील दंड मात्र माफ होणार नाहीत. त्यामध्ये –
मद्यपान करून वाहन चालविणे
अपघात करून पळ काढणे
निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात घडविणे
अल्पवयीनाने वाहन चालविणे
अनधिकृत शर्यत आयोजित करणे किंवा सहभागी होणे
गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असलेले गुन्हे
अन्य राज्यातील नियमभंग
यासाठी दंड केवळ कायदेशीर प्रक्रियेनंतरच वसूल केला जाईल.
नागरिकांसाठी फायदा
वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा. प्रलंबित दंड सवलतीत भरल्यास आर्थिक भार कमी होईल. तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती होईल. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हा उपक्रम ती कमी करण्यास मदत करेल.
यासोबतच सुरक्षित वाहतूक आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व नागरिकांच्या मनात दृढ करण्याचा उद्देशही साध्य होईल. त्यामुळे या चार दिवसांत अधिकाधिक पुणेकरांनी दंड भरण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.