TRENDING:

Pune Water Cut: पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, का आणि कुठं? पाहा सविस्तर

Last Updated:

Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून पाण्याचा जपून वापर करावा लागेल. गुरुवारी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: गेल्या काही दिवसांत पुण्यात पावसाचा जोर असतानाच नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पर्वती जलकेंद्रातून आणि लष्कर जलकेंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या लाईनमध्ये आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी, 30 ऑक्टोबर रोजी संपूर्ण पूर्व पुणे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत.
Pune Water Cut: पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, का आणि कुठं? पाहा सविस्तर
Pune Water Cut: पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, का आणि कुठं? पाहा सविस्तर
advertisement

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम नियोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन जलकेंद्रांद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार आहे.

पुण्याचं नशीब उजळलं, उभारणार ‘सुपर टेक्नो प्लांट’, 345 कोटींची गुंतवणूक जाहीर; 300 नवीन नोकऱ्या निर्माण होणार

advertisement

पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे, तसेच पाणी वापरताना काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही केले आहे.

या भागांचा राहणार पाणीपुरवठा बंद

लष्कर भाग: सोलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, माठवाडी, गोकुळ नगर, ससाणे नगर, काळेवाडी, मुण्डवा, भोसलेनगर, सोलापूर रोड डावी बाजू,केशवनगर, मांजरी बुद्रुक,सोवळेवाडी, बी. टी कवडरोड,भीमनगर, बालाजी नगर,विकास नगर,कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन,मोहम्मदवाडी,साडेसतरा नळी,संपूर्ण हांडेवाडी रोड,फुरसुंगी,उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर व उरुळी देवाची (बेकर हिल टाकी).

advertisement

खाराडी भाग: खाराडी भाग, आपले घर, भाईनगर बस्ती, चौथी वस्तीसह संपूर्ण खाराडी परिसर, चंदन नगर, बोराटे नगर, यशोदा नगर, तुकराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, साईसृष्टी नगर, मधुबन नगर, भोसलेनगर व माळवाडी परिसर.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

भामा आसखेड योजना: शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती,साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक आणि पोटे नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, का आणि कुठं? पाहा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल